Vijay Wadettiwar Farmers Relief । अतिवृष्टीग्रस्त तालुके नुकसान भरपाई यादीत समाविष्ट; वडेट्टीवार पुन्हा ठरले शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक

January 17, 2026 by Prakash Hande

Vijay Wadettiwar Farmers Relief

Vijay Wadettiwar Farmers Relief : ब्रह्मपुरी १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) - यंदाचे वर्षी खरीप हंगामात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे शेतातील उभे पीक पूर्णतः उध्वस्त झाले. अशा आसमानी संकट काळात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार कडे संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत देऊन, सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली. तसेच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी केलेल्या आग्रही मागणीच्या पाठपुराव्याला यश आले असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मदत मिळणार आहे. Kharif Crop Damage Maharashtra

Also Read : चंद्रपुरात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

राजकारणा सह सामाजिक बांधिलकी जोपासणारा सहृदयी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजय वडेट्टीवार यांची सर्वदूर ओळख आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, कामगार, मजूर यांच्या समस्यांचे निराकरणासाठी सदैव पाठीशी खंबीर उभे राहणारे विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात यंदाचे वर्षी झालेल्या अतिवृष्टीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. व लगेच कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

सततच्या पाठपुराव्याला यश

शेतकऱ्यांची दैन्यावस्था बघून सदर मागणी त्यांनी शासन दरबारी रेटून धरल्याने अखेर आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही या तीनही तालुक्यांचा अतिवृष्टी व नुकसानग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. विधिमंडळ पक्षनेते,आ विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे सदर तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मदत मिळणार असून एक कर्तव्यदक्ष,शेतकऱ्यांप्रती सहृदयी लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा याचा प्रत्यय ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आला आहे.

Leave a Comment

+