Livestock Smuggling Case : चंद्रपूर ६ जानेवारी : जिल्ह्यात अवैध गोवंश तस्करी करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने आपली कंबर कसली असून, पो.स्टे. शेगाव अंतर्गत येणाऱ्या भिवकुंड परिसरात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ बैलांची अमानुष सुटका केली असून, ७ लाख २० हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (शिवीगाळी केली म्हणून तरुणाला दगडाने ठेचलं)
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गोवंशाच्या अवैध वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने भिवकुंड येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, नागपूरच्या दिशेने जाणारा पिकअप वाहन क्रमांक MH-49 BZ-1769 हा संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तो थांबवला. वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये ६ नग गोवंश (बैल) अत्यंत निर्दयीपणे आणि दाटीवाटीने बांधलेले आढळले. या जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसून त्यांची अवैध मार्गाने वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. Livestock Smuggling Case
या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक महेश सुर्यभान लोंढे (वय ३८, रा. गोरेवाडा, नागपूर), राहुल अरुण वानखेडे (वय २३, रा. हिंगणा, नागपूर) आणि सचिन वैद्य (रा. कोंढा, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) या तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत जप्त केलेल्या ६ बैलांची किंमत आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या या धडक कामगिरीमुळे अवैध प्राणी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Leave a Comment