शेती आता हायटेक; बजेटवर किशोर जोरगेवार काय म्हणाले?

February 01, 2026 by Prakash Hande

Chandrapur MLA Budget Reaction : चंद्रपूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या यात्रेला गती देणारादेशाच्या आकांक्षा आणि नवभारताचा आत्मविश्वास स्पष्टपणे प्रतिबिंबित करणारा असल्याची ठाम प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात शेतकरीमहिलायुवककामगारमध्यमवर्ग तसेच लघु व मध्यम उद्योगांना केंद्रस्थानी ठेवतदेशाच्या आर्थिक बळकटीसाठी दूरदृष्टीपूर्ण आणि निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत. (शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, खासदार धानोरकर यांची अर्थसंकल्पावर टीका

  हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला अधिक बळ देणारा असूनदेशाच्या सर्वांगीण विकासाचा ठाम रोडमॅप मांडणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षमनिर्णायक आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली आज भारत केवळ देशांतर्गतच नव्हेतर जागतिक पातळीवरही आर्थिकसामरिक आणि राजनैतिक दृष्ट्या भक्कम स्थान मिळवून उभा आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज आता दुर्लक्षित करता येणार नाहीही वस्तुस्थिती या अर्थसंकल्पातून अधिक ठळकपणे दिसत आहे.

  कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असूनग्रामीण भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा स्पष्ट संकल्प या अर्थसंकल्पातून दिसून येतो. एमएसएमई क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करून लघु व मध्यम उद्योगांना नवसंजीवनी देण्यात आली असूनयामुळे रोजगारनिर्मितीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढेलअसे आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी शी-मार्ट्स’ आणि स्वयं-सहायता गटांसाठी उद्योजक मार्ट्स’ स्थापन करण्याचा निर्णय हा महिला सक्षमीकरणापुरता मर्यादित न राहतामहिलांना आर्थिक नेतृत्व देणारा ठोस निर्णय आहे. शेती व पीक उत्पादन वाढवण्यासाठी एआय आधारित टूल्सचा वापर करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा सरकारचा निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट होतो.

पशुपालनासाठी कर्ज-संबंधित अनुदान योजनामत्स्यपालनाला चालना देण्यासाठी ५०० नवीन जलाशयांची उभारणीतसेच समावेशक विकासावर भर देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा निर्णय हा ग्रामीण भागांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरेल. १५,००० माध्यमिक शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब२०३० पर्यंत २० लाख कुशल व्यावसायिकांची निर्मिती आणि कॅन्सरवरील १७ औषधांच्या किमती कमी करण्यासारखे निर्णय हे सामाजिक न्याय आणि लोकहिताचा सरकारचा स्पष्ट अजेंडा दर्शवतात.

 ‘विकसित भारत’ हे केवळ स्वप्न नसूनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ते प्रत्यक्षात साकार होत आहे. त्या दिशेने टाकलेले हे ठोसनिर्णायक आणि ऐतिहासिक पाऊल असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी ठामपणे सांगितले.

Leave a Comment

+