Aam Aadmi Party Maharashtra campaign : चंद्रपूर - महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या दिवशी, आम आदमी पार्टीच्या राज्य समितीच्या पुढाकाराने संपूर्ण राज्यात जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी 'सुराज्य मोहीम' या अभियानाचा भव्य शुभारंभ चंद्रपूर येथील आझाद बाग मैदानावर मोठ्या उत्साहात झाला. AAP Surajya Abhiyan launch
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची स्वप्नपूर्ती
ही मोहीम ४५०० किलोमीटरचा प्रवास करत संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये पोहचणार असून, पाणी, आरोग्य, वीज, शिक्षण, भ्रष्टाचार, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाघ हल्ला, वीज फसवणूक यांसारख्या विविध मुद्द्यांवर जनतेशी थेट संवाद साधून, सरकारला हिशेब मागण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. Chandrapur AAP rally 2025
🔹 अॅड. मनीष मोडक – राज्य संघटक
🔹 भूषण ढाकुलकर – राज्य संघटन सचिव
🔹 डॉ. अभिजीत मोरे – राज्य सचिव
🔹 डॉ. शाहिद अली जाफरी – राज्य सचिव
🔹 सागर पाटील – राज्य सहसचिव
🔹 डॉ. नामदेव भागिले पाटील – सोशल मीडिया प्रमुख
या कार्यक्रमाचे नेतृत्व मयूर राईकवार – जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर यांनी केले.

कार्यक्रमाला पुढील मान्यवरांची उपस्थिती होती:
वसंतराव डोके – यवतमाळ जिल्हाध्यक्ष, सुनिल मुसळे – ज्येष्ठ नेते, योगेश गोखरे – शहराध्यक्ष, चंद्रपूर, राजू कुडे – युवा अध्यक्ष, राजकुमार नगराळे – जिल्हा सचिव, संतोष बोपचे – महानगर संगठन मंत्री, अॅड. तबसूम शेख – महिला आघाडी अध्यक्ष, दीपक बेरशेट्टीवार , जितेंद्र कुमार भाटिया ,अॅड. सफिया शेख, जावेद सय्यद,अदित्या नंदनवार, अजय बाथव, सागर बोबडे, भीमराज बागेसर, जयदेव देवगडे, मनोहर साखरकर, मधुकर साखरकर, सुनील सदभेया, सिकंदर सागोरे, सुधीर पाटील, परमजीतसिंग झगडे, करुणाताई यांचार्लावर, सुजाता देठे, कविता मॅडम, संतोष दुरखंडे, आकाश सतावडे, पंकज उरकुडे इत्यादि सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Mayur Raikwar AAP Chandrapur
जनतेच्या प्रश्नांचा आवाज
या मोहिमेच्या माध्यमातून सरकारच्या फसव्या योजनांवर जनतेने थेट प्रश्न विचारले. लोकांच्या हाती असलेल्या फलकांवरील काही ठळक मुद्दे:
"कोरड्या नळांनी उघड केलं खोटं अमृत!"
"234 कोटी कुठे गेले? – जनतेला हक्काचा हिशेब हवा!"
"औषधं नाही, मशीन नाही – रुग्ण मरतो, सरकार पाहतो!"
"200 युनिट वीज कुठे? – आमदार कुठे लपले?"
"वाघाचे तोंड, सरकारचा मौन – शेतकरी मरतो!"
"ही कुणाची जमीन? मग नोकरी बाहेरच्यांना का?"
"काम केलं, पण पगार शून्य – अन्याय सहन नाही!"
"चंद्रपूरचा हक्क मागतोय उत्तर – फसवणूक नाही, हिशेब हवा!", "जनतेचा संयम संपला – आता संघर्षाचा नारा!", "विकासाचे खोटे पोस्टर फाडून, वास्तव समोर आणा!" या घोषणा देत उपस्थित कार्यकर्त्यांनी चंद्रपूरच्या प्रश्नांना आवाज दिला.
Leave a Comment