Chandrapur solar village । चंद्रपूर जिल्ह्यात क्रांती! सूर्याच्या ऊर्जेवर झगमगले सादागड हेटी गाव!

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur solar village

Chandrapur solar village : चंद्रपूर : आज दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सादागड हेटी गावाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत जिल्ह्यातील पहिले 'सौरग्राम' होण्याचा बहुमान मिळवला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्य मार्गदर्शक मा. मुख्य अभियंता श्री. हरीश गजभे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मा. अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे मॅडम यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरण आदेश त्वरित मिळवण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मीना सालुंखे मॅडम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. Sadagad Heti solar initiative

एसी बसविण्यासाठी चंद्रपुरातील डॉक्टरची ३५ लाखांनी फसवणूक

याशिवाय, महावितरण मूल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले. तसेच, दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी ली. चंद्रपूरचे व्यवस्थापक श्री. सूरज बोमावर यांच्या त्वरीत प्रतिसादाने गावकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या सर्वांच्या सहकार्यामुळे प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सावली तालुक्यातील सादागड हेटी गावाने 'सौरग्राम' बनण्याचा मान पटकावला आहे. Maharashtra rural solar power

गावातील सौरऊर्जा प्रकल्पाचा आढावा सादागड हेटी हे गाव मूल पासून अवघ्या १० किमी अंतरावर असून सावली तालुक्यातील टेकाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येते. गावात एक प्राथमिक शाळा आणि एकूण १९ घरे आहेत. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत, येथील प्रत्येक घराच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले. विशेष म्हणजे, शाळेसाठी देखील स्वतंत्रपणे १ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प (विना अनुदान) उभारण्यात आला आहे. यामुळे गावात एकूण २० किलोवॅटची सौरऊर्जा निर्मिती केली जाणार असून, महिन्याला सरासरी २४०० युनिट वीज निर्मिती होईल.

योजनेंच्या अंमलबजावणीतील सहकार्य आणि पुढील वाटचाल संपूर्ण गावाला सौर ऊर्जेने स्वयंपूर्ण करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ३ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली. केवळ २० दिवसांत सर्व अडचणी दूर करत, महावितरण मूल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया आणि त्यांची टीम, मंडळ कार्यालयातील श्री. राठोड (उपकार्यकारी अभियंता), तसेच संबंधित सोलर एजन्सी यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी ली. चंद्रपूर यांनी आवश्यक वित्तसहाय्य पुरवल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात आला. Government solar schemes for rural areas

सादागड हेटी गावातील सर्व रहिवासी आदिवासी समाजाचे असून, त्यांच्या गावाने जिल्ह्यातील पहिले 'सौरग्राम' होण्याचा मान मिळवल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. शासनाच्या या योजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असून, हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Comment

+