Operation Lotus Chandrapur : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मनपा निवडणूक निकालात ६६ जागेपैकी कांग्रेस मित्रपक्ष यांना ३० जागा, भाजप मित्रपक्ष २४ जागा, शिवसेना-वंचित ८ जागा, बसपा १ व Aimim १ व अपक्ष २ मिळाल्या आहे, मात्र बहुमताच्या ३४ या आकड्यापासून भाजप व कांग्रेस दूर आहे, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना हि किंगमेकर च्या भूमिकेत आहे. त्यांच्या समर्थनाने कांग्रेस ला महापौर बसविणे सोपे जाणार आहे, पण सध्या तरी यावर चर्चा सुरु आहे. याउलट भाजपने संख्याबळ नसताना सुद्धा महापौर आमचा होणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. (महापौर आमचाच होणार, भाजपचा सूर)
शिवसेना ठाकरे व वंचित युतीचे एकूण ८ नगरसेवक निवडून आले आहे, मिळालेल्या माहितीनुसार भाजपने शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी व्हावे अशी बोलणी सुरु केली होती, आम्ही विरोधात बसू पण शिवसेनेचे समर्थन घेणार नाही अशी भूमिका भाजपने घेतल्यामुळे शिवसेनेसोबत पुढची बोलणी सध्या तरी बंद झाली आहे. राहिला कांग्रेसचा प्रश्न, कांग्रेस पक्षात सध्या दोन गट पडले आहे, वडेट्टीवार व धानोरकर गटात महापौर पदासाठी आपल्या समर्थकांची वर्णी लागावी असा संघर्ष सुरु झाला आहे, सत्तेच्या जवळ असताना कांग्रेस पक्ष सध्या आपला पोरखेळ करीत आहे. शिवसेनेसोबत बोलणी बंद झाल्यावर कांग्रेसच्या गोटातील काही नगरसेवक भाजप पक्ष फोडू शकतात अशी माहिती आहे.
इतर जिल्ह्याप्रमाणे चंद्रपुरात भाजपचे ऑपरेशन लोटस सुरु होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास चंद्रपूर मनपामध्ये भाजपचा महापौर होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. २२ जानेवारी रोजी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे, त्यानंतर चंद्रपूर शहराच्या राजकारणात सुरु असलेले चित्र स्पष्ट होणार.
Leave a Comment