Chandrashekhar Shetty BJP : चंद्रपूर - गटनेता पदावरून कांग्रेस पक्षात चांगलाच संघर्ष उफाळल्याचे चित्र प्रत्येकानी बघितले. खासदार धानोरकर यांनी कांग्रेस नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करीत सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, त्यावरून कांग्रेस पक्षात चांगलीच दुफळी निर्माण झाली. अश्यातच भारतीय जनता पक्षाने गट नोंदणी करीत प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेट मधील नगरसेवक चंद्रशेखर शेट्टी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. असे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण यांनी जारी केले आहे. (महापौर मतदानापूर्वी नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ)
ज्याप्रमाणे कांग्रेस पक्षात पहिल्यांदाच नगरसेवक पदी विराजमान झालेल्या सुरेंद्र अडबाले यांना संधी दिली त्याच प्रकारे भाजपने सुद्धा पहिल्यांदा निवडून आलेल्या चंद्रशेखर शेट्टी यांना गटनेतेपदावर संधी दिली आहे. चंद्रपूर महानगरपालिका राजकारणात कांग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यानंतर सुद्धा सत्ता स्थापन करण्यासाठी कांग्रेस पक्षाला मोठा संघर्ष करावा लागत आहे.
एकीकडे कांग्रेस पक्षात दोन गट पडले असताना, भाजपात निवडणुकीपूर्वी जो गोंधळ झाला त्या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देत गटनेता निवडताना पुन्हा गोंधळाची स्थिती उदभवू नये यासाठी प्रदेश अध्यक्षांनी गटनेत्यांच्या नावाने पत्र काढले. १० फेब्रुवारीला महापौर पदावर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Leave a Comment