mother and daughter killed in road accident । आई, आपण पोहचू ना?" – पण त्या दोघींचा प्रवास वाटेतच संपला

January 17, 2026 by Prakash Hande

mother and daughter killed in road accident

mother and daughter killed in road accident : बल्लारपूर - राजूराहून चंद्रपूरकडे दुचाकीने जात असताना ट्रक खाली येऊन आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा नदीच्या राजुरा पुलाजवळ बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बामणी गावाच्या हद्दीतील जलाराम मंदिराच्या समोर सोमवारचे दुपारी दीड वाजताचे दरम्यान घडला आहे.

चंद्रपुरात जड वाहनांना नो एंट्री?

मृतकाचे नाव ज्योती बंडू रागीट (३८ वर्षे) आणि त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट (८ वर्षे) राहणार पेठ वार्ड राजुरा, असे आहे . ज्योती या स्कुटी क्रमांक एम एच ३४ बी एस५५३८ ने चंद्रपूरला आपल्याकडे आईकडे जात होत्या. धडक दिलेल्या ट्रकचा क्रमांक एम एच ३४बीझेड ७६९९ असा आहे.सेजल ही सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी होती.

https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=qVNzNHEKOyFlpOVg


बामणी - राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रिय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सूरू आहे. रस्त्याची उंची वाढविण्याकरीता मातीचे ढिगारे टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याने या धिगाऱ्यावरील माती रस्त्यावर येत आहे. पावसात घसरून तर पाऊस नसताना प्रचंड धुळीचे साम्राज्य या ठिकाणी बघायला मिळत आहे. national highway construction accident

जीव मुठीत घेऊन प्रवास

नुकत्याच झालेल्या पावसात तर भर रस्त्यात चिखल होऊन अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागला. या मार्गावरून नेहमीच प्रवश्याना तारेवरची कसरत करावी लागत असुन वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा अनेकांना प्राणाला मुकावे लागणार असल्याची भिती प्रवाशी व्यक्त करीत आहेत.

पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोअं. नरेंद्र वाकडे करीत आहे

Leave a Comment

+