Degree Required for Job : चंद्रपूर : अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करीत नोकरीसाठी अर्ज केला, मात्र विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे नोकरी मिळणे कठीण झाले, पण अखेर नोकरी मिळाली, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचा सततच्या पाठपुराव्यामुळे शैक्षणिक कागदपत्रे लगेच मिळाली, नोकरी गमावण्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या विद्यार्थिनीसाठी बेलखेडे हे देवदूत ठरले, नोकरी मिळवली त्या विद्यार्थिनींनी सिनेट सदस्य बेलखेडे यांचे आभार मानले. (चंद्रपुरात महापौर पदासाठी राजकीय दबावतंत्राचा खेळ सुरु)
उन्हाळी परीक्षा 2024 ला राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील कु.समीक्षा निमसटकर ही विद्यार्थीनी पास झाली. परंतु तिला सातव्या आणि आठव्या सेमिस्टर चे ओरिजिनल मार्कशीट आणि डिग्री मिळालेली नव्हती. याबद्दल महाविद्यालय मध्ये वारंवार अर्ज दिलेत. 10 नोव्हेंबर 2025 ला कॉलेजनी या संदर्भात DBATU विद्यापीठला मेल केला. पण तरीही मार्कशीट, डिग्री मिळाली नाही. ऍमेझॉन या नामांकित कंपनी मध्ये नौकरी मिळावी म्हणून समीक्षा ने मुलाखत दिली आणि पास झाली.
परंतु कागदपत्र छाननी प्रक्रियेची ची शेवटची तारीख दिनांक 21 जाने. असताना सुद्धा तिच्याकडे सातव्या व आठव्या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण झाल्यानंतरची मार्कशीट आणि डिग्री नसल्याने तिला मानसिक त्रासातून समोर जावे लागले. यापूर्वी सुद्धा तिला याच कारणामुळे नौकरी ची संधी गमवावी लागली होती. यावेळी पण नौकरी हातातून जाईल कि काय अशी भीती होती. अशा परिस्थितीत समीक्षा निमसटकर हिने सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांच्याशी संपर्क साधून आपबीती कथन केली. प्रा. निलेश बेलखडे यांनी नागपूर येथील उपविभागीय कार्यालयात रिजिनल ऑफिसर डॉ.कुलकर्णी यांच्याशी बोलण केल. Degree Required for Job
लोणारे, रायगड, मुंबई कार्यालयात डॉ. अमित शेष, कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्याशी कॉल वर बोलणे करून संबंधित विद्यार्थिनीची व्यथा मांडली आणि गांभीर्य सांगून सहकार्य करण्याकरिता विनंती केली. यानंतर अवघ्या तासाभरात त्या विद्यार्थिनी ला तिच्या दोन्ही मार्कशीट आणि डिग्री तिच्या मोबाईल वर soft copy स्वरूपात आणि hard copy नागपूर येथील कार्यलयातून प्राप्त झाली. त्यानंतर त्या मुलींनी ऍमेझॉन कंपनी च्या वतीने दिलेल्या सायंकाळी 5 च्या पहिले पंधरा मिनिट बाकी असताना सर्व कागदपत्रे मेलद्वारे त्यांना पाठविले आणि प्रक्रिया पार पाडली. लगेच तिला कंपनी च्या वतीने ईमेल आला कि तिच्या कागदपत्राची छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन तिची नौकरी पक्की झाली आहे.
जिल्ह्यातील एक अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक निलेश बेलखेडे यांना या संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती असल्यामुळे त्यांनी ही धावपळ केली आणि या विद्यार्थिनीला अगदी शेवटच्या क्षणाला नोकरी मिळाली.मागच्या वर्षी सुद्धा बल्लारपूर येथील विद्यार्थिनीला सुद्धा निलेश बेलखेडे यांनी सहकार्य केले होते आणि अगदी वेळेवर क्षणाला तिला कागदपत्रे मिळाल्यामुळे तिची नौकरी वाचली होती. परंतु जिल्ह्यात या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अशा शेकडो नव्हे हजारो विद्यार्थिनी अशा आहेत ज्यांना मार्कशीट किंवा डिग्री प्राप्त न झाल्यामुळे आज हाती असलेल्या अनेक संधीला मुकावे लागत आहे. त्यामुळे या संदर्भात संबंधित डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेकनिकल युनिव्हर्सिटी, लोणारे रायगड येथील व्यवस्थापनाने आणि संभदीत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना त्रास न देता आणि त्यांचे भविष्य टांगणीला न टांगता योग्य ती कारवाई करावी, आणि विद्यार्थ्यांना मार्कशीट्स, डिग्री इ. कागदपत्रे मिळवून दयावी. अन्यथा येत्या काळामध्ये विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेत भव्य आंदोलन उभे करावे लागेल असा इशाराच युथ ऑफ चांदा फॉउंडेशन चे अध्यक्ष आणि गोंडवाना विदयापीठ सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखडे यांनी दिला आहे.
Leave a Comment