शिवसेना-वंचित गटाचे १० नगरसेवक ठरविणार चंद्रपूरचा महापौर

January 24, 2026 by Prakash Hande

Power Game in Politics: चंद्रपूर - महानगरपालिका राजकारणात रोज नवनवीन बदल होत आहे, दबावतंत्राच्या या राजकारणात सध्या प्रतिभा धानोरकर या अग्रेसर ठरल्या आहे, चंद्रपूर महानगरपालिका मध्ये महापौर बसविताना मॅजिक फिगर ३४ ची जुळवाजुळव करावी लागणार आहे, हि जुळवाजुळव सध्या कांग्रेस साठी सोपी आहे मात्र अंतर्गत कुरघोडीमुळे सध्या कांग्रेस पक्षात गोंधळ सुरु आहे. जनविकास सेना तर्फे ४ नगरसेवकांचा गट तर शिवसेना-वंचित तर्फे ८ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. (महापौर खासदार धानोरकर ठरवतील - विजय वडेट्टीवार)

सध्या महानगराच्या राजकारणात शिवसेना-वंचित किंगमेकरच्या भूमिकेत आहे, अश्यातच या गटाला २ अपक्ष नगरसेवकांची साथ लाभली आहे. आता शिवसेना-वंचित गटाकडे एकूण १० नगरसेवक आहे. कांग्रेसचे बंडखोर नंदू नागरकर, प्रशांत दानव यांनी अपक्ष निवडणूक लढवीत राजकीय पक्षांना पराभवाची धूळ चारली. कांग्रेस नेते आमदार वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवली असून एका नगरसेवकाला पदसह तब्बल १ कोटी रुपयांची ऑफर असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे.

शिवसेना-वंचित गटाचे १० नगरसेवक यांनी वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत चंद्रपुरातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली व कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व वंचित आघाडी महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके सह १० नगरसेवकांची उपस्थिती होती. नगरसेवकांचा गट आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे, त्यानंतर कुणाला पाठिंबा द्यायचा यावर अंतिम निर्णय होणार आहे. Power Game in Politics

चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर बसविण्यासाठी शिवसेना-वंचित गटाचा पाठिंबा महत्वाचा आहे, तेव्हाच भाजप किंवा कांग्रेस पक्षाचा महापौर मनपात बसू शकतो शिवसेना-वंचित हा गट कुणाला पाठिंबा देणार यावर सध्यातरी सस्पेन्स कायम आहे.

   

Leave a Comment

+