चंद्रपुरात वाघाचा मृत्यू

January 11, 2026 by Prakash Hande

Dead tiger found tadoba : चंद्रपूर ११ जानेवारी - मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनेत अनेक नागरिकांचा बळी वर्ष २०२५ मध्ये गेला होता, त्याचबरोबर वाघाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र मागील वर्षी दिसले, नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चंद्रपुरात वाघाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.  (डेली नीड्स च्या दुकानात नायलॉन मांजाची विक्री)

ताडोबा पासून जवळ असलेल्या पायली-भटाळी जवळील चिंचोली गावात आज सकाळच्या सुमारास इरई नदीच्या काठावर वाघाचा मृतदेह तरंगताना आढळला, सदर मृतदेह हा २ ते ३ दिवसांपूर्वी असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षी चिंचोली गावात एका ६५ वर्षीय गेडाम यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. घटनेनंतर वनविभागाची चमू उशिरा आल्याने गावकऱ्यांचा वनविभागवर रोष उफाळला होता.

चिंचोली गावातील नागरिकांनी वाघाच्या मृतदेहाबद्दल वनविभागाला माहिती दिली असून वनपरिक्षेत्र अधिकारी वारेपूर घटनास्थळी दाखल झाले आहे.

Leave a Comment

+