Congress Group Leader : चंद्रपूर - धानोरकर-वडेट्टीवार संघर्षावर अखेर पडदा पडला असे अनेकांना वाटले मात्र 23 जानेवारीला खासदार धानोरकर यांनी कांग्रेस नगरसेवकांचा गटाची नोंदणी करीत गटनेतेपदी नगरसेवक सुरेंद्र अडबाले यांची निवड केली, हा आमदार वडेट्टीवार यांच्यासाठी मोठा धक्का असून पुढील 3 दिवस सुट्टी असून आता नव्या गटाची नोंदणी करता येणार नाही, 27 जानेवारी रोजी महापौर पदासाठी अर्ज दाखल करायचा आहे, धानोरकरांच्या या राजकीय खेळीने कांग्रेस पक्षातील विरोधक गार झाले आहे. (चंद्रपूर महापौर साठी बहुमताचा खेळ सुरू)
गटनेता निवडीवरून कांग्रेस पक्षातील आमदार वडेट्टीवार व खासदार धानोरकर यांच्यामधील वाद वाढत गेला होता, या वादात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मध्यस्ती करावी लागली. गटनेता म्हणून सुरेंद्र अडबाले यांचं नाव प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मंजूर केले मात्र त्या नावावर वडेट्टीवार गटाकडून अडबाले यांच्या नावावर विरोध दर्शवला. Congress group leader
चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौर खासदार प्रतिभा धानोरकर ठरविणार असून यासाठी 5 नावे निश्चित करण्यात आले आहे. अंतिम यादीत माजी महापौर संगीता अमृतकर, नगरसेविका संगीता भोयर, वैशाली महाडूळे, सुनंदा धोबे व संजीवनी वासेकर यांचा समावेश आहे, येत्या 2 दिवसात महापौर उमेदवाराची घोषणा होणार आहे. मित्र पक्षाला स्थायी समिती व उपमहापौर पद देण्यात येणार अशी माहिती आहे.
Leave a Comment