लाटबोरीत पोलिसांची धाड, 25 पॉकेट ईगल-होला शिशा सापडले

May 25, 2026 by Prakash Hande

सिंदेवाही - चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी व साठवणूक करणाऱ्या माफियांवर कारवाई मोहीम सुरु आहे, या मोहिमेअंतर्गत सिंदेवाही पोलिसांनी एकाकडून ३ हजार ८०० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. आरोपींवर सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (साहेब लवकर या मी पत्नीचा खून केला, पोलीस पोहोचले आणि धक्का लागला)

 

सिंदेवाही पोलीस गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली कि एकाने राहत्या घरात सुगंधित तंबाखूची साठवणूक करून ठेवली आहे, माहितीच्या आधारे पोलिसांनी लाटबोरी मध्ये जात ४० वर्षीय प्रवीण खाटुजी मदनकर यांच्या घरची झडती घेतली असता एका प्लास्टिक च्या चुंगडीत होला हुक्का शिशा तंबाखू, ईगल हुक्का शिशा तंबाखू २५ पॉकेट असा एकूण ३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

आरोपी प्रवीण मदनकर वर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३, २७५ व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २६(२) (i), २६ (२) (iv), ३० (२) (a) व ५९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.

Leave a Comment

+