112 Fake Call : चंद्रपूर - आपत्कालीन परिस्थितीसाठी सरकारने नागरिकांसाठी ११२ हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे, नागरिकांना जलद मदत यामुळे प्राप्त होते मात्र कधीकाळी काही खोडकर पोलिसांना खोटी माहिती देण्याचे काम करीत असतात. असाच एक प्रकार चंद्रपुरात घडला, याप्रकरणी पोलिसांनी ११२ वर कॉल करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. (गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई)
२४ मे ला पडोली पोलिसांना फोनवर वर माहिती मिळाली कि कोसारा फाटा येथे एक व्यक्ती मरण पावला आहे, अश्या माहितीवरून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, पोलीस मर्ग चा तपास करीत असताना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ११२ वर कॉल आली कि कॉल करणाऱ्याने बायकोला जीवे मारले असून कॉलर घटनास्थळी आहे. पोलिसांनी थेट कॉलरला फोन करीत माहिती विचारली असता त्याने सांगितले कि मी बायकोचा मर्डर करीत मृतदेह फेकला.
पोलिसांनी घरचा पत्ता विचारला असता त्याने पत्ता दिला, पोलीस तात्काळ घरी दाखल झाले, घरी पोहोचल्यावर पोलिसांना घरी कॉलर व त्याची पत्नी आढळून आली. त्यावेळी कॉलरच्या पत्नीने माहिती दिली कि माझा नवरा अंजुराम शाहू हा कालपासून दारू पीत असून त्याने फोन करून तुम्हाला खोटी माहिती दिली.
पोलिसांनी अंजुराम ला विचारले कि तुम्हाला खोटी माहिती का दिली, असे विचारताच अंजुराम पोलिसांच्या अंगावर धावून आला, पोलिसांनी स्वतःचा बचाव केला, मात्र अंजूराम दारूच्या नशेत असल्याने त्याचा तोल गेला असता तो इंधनासाठी जमा केलेल्या लाकडावर पडला. त्यामध्ये त्याला किरकोळ दुखापत झाली.
शासकीय काम करीत असताना ११२ द्वारे खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल व शासकीय कामात अडथळा, खोटी माहिती देत पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी अंजूराम शाहू वर बीएनएस २०२३ कलम १३२, २१२ व २२१ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Leave a Comment