school route flooded in railway underpass : गडचांदूर : सततच्या पावसामुळे गडचांदूर परिसरातील होली फॅमिली शाळेजवळ असलेल्या मार्गावरील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पवनी प्रकल्पग्रस्तांची मागणी पूर्ण होणार? लवकरच मिळणार न्याय
होली फॅमिली शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज गुडगाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. बोगद्यात पाणी साचल्याने त्यांचा शाळेत जाण्याचा व येण्याचा मार्ग धोकादायक बनला आहे.
विद्यार्थ्यांचे पालक यामुळे चिंतेत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच स्थिती निर्माण होत असूनही उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. हा मार्ग लखमापूर गावाकडे जातो या मार्गावर अल्ट्रटेक सिमेंट कंपनीच्या माल वाहतुकीसाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे.
त्या ठिकाणी हा बोगदा तयार करण्यात आला मात्र पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावं लागत आहे
Leave a Comment