tiger attack in Chandrapur district : मूल:- दबा धरून बसलेल्या वाघाने एका गुराख्यावर हल्ला करून त्यास ठार केले. तर,दुस-या एका गुराख्यास जखमी केले. ही घटना मूल तालुक्यातील कोसंबी चक येथील शेतशिवारात सकाळी आठ वाजताच्या दरम्यान गुरूवारी घडली.
Powered by myUpchar
भावी वधूसमोर तरुणाने घेतला गळफास
या घटनेने मूल तालुका हादरला आहे.मे महिण्यातील ही चौथी घटना आहे.मृतक गुराख्याचे नाव बंडू परशुराम उराडे,वय 55 रा.करवन असे आहे.तर किशोर मधुकर उराडे वय 35,रा.करवन हा वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. तालुक्यातील करवन येथिल चार ते पाच गुराखी गावातील जनावरे घेवून जंगलाच्या दिशेने गेली होती.गावापासून जवळपास तीन किमी अंतरावर असलेल्या कोसंबी चक येथील शेतशिवारात सकाळी सात वाजताच्या दरम्यान गुरे ढोरे चारत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बंडू उराडे यांच्यावर हल्ला चढविला. त्यात बंडू घटनास्थळीच ठार झाला. tiger attack news today India
काकाला वाघाच्या तावडीतून वाचविण्यासाठी गेेेलेल्या पुतण्या किशोर वर सुदधा वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले.इतर तीन गुराखी त्याच परिसरात आपली गुरे चारत होती. बंडू आणि किशोर हे दोघे काका पुतणे आहेत. जवळपास ही घटना सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली.
मारोडा येथील भूपेश खानोरकर यांच्या शेतशिवारात ही जनावरे चरत होती.या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.घटनास्थळी वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी भेट दिली. करवन गावात या घटनेने गावक-यांचा चांगलाच जमाव तयार झालेला होता.वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वाघाच्या हल्यातील ही मूल तालुक्यातील चौथी घटना आहे. मानव वन्यजीव संघर्ष तालुक्यात अधिकच तीव्र होताना दिसत आहे. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात आतापर्यंत २२ नागरिकांचा बळी गेला आहे.
Leave a Comment