Big news Firing in Chandrapur : चंद्रपूर : गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेल्या दोन भावात झालेल्या आपसी वादातून लहान भावाने मोठ्या भावाची गोळी घालून हत्या केल्याची घटना बुधवार दि. ३० जुलै रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जुनोना येथील विकतुबाबा मंदिराच्या मागील परिसरात घडली.
कुख्यात गुंडांवर MPDA कायद्यान्तर्गत केले स्थानबद्ध
बुद्दासिंग टाक (५०) रा. जुनोना असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे तर लहान भाऊ सोनुसिंग टाक हा फरार आहे.
सोनुसिंग व बुद्दासिंग या दोन भावात मागील काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू आहेत.
बुधवारी सायंकाळी दोघात आपसी वाद झाला. वाद ऐवढ्या विकोपाला गेला की लहान भावाने मोठ्या भावाला गोळी मारून जागीच ठार केले.
मृतक व आरोपी यांच्या चंद्रपुर जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असून आरोपी सोनुसिंग टाक यांचेवर चंद्रपूर जिल्ह्यातुन तडीपाराचा आदेश नुकताच निर्गमीत करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस अधिक्षक सुर्दशन मुमक्का, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलिस निरीक्षक आसीफ राजा यांनी भेट देत घटनेचा तपास करीत आहे.
Leave a Comment