repeat offender jailed under MPDA Chandrapur । चंद्रपूर पोलिसांचा मोठा दणका – दहशत माजवणाऱ्या गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई

January 17, 2026 by Prakash Hande

repeat offender jailed under MPDA Chandrapur

repeat offender jailed under MPDA Chandrapur : चंद्रपूर - ९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर चंद्रपूर पोलिसांनी MPDA कायदा अंतर्गत कारवाई करीत त्या गुन्हेगाराला वर्षभरासाठी मध्यवर्ती कारागृह चंद्रपूरमध्ये स्थानबद्ध करण्यात आल्याचा आदेश २४ जुलै रोजी पारित करण्यात आला.

चंद्रपूर पोलिसांच्या रेकॉर्डवरील धोकादायक व्यक्ती कुख्यात गुंड, जबरी चोरी, अंमली पदार्थाची विक्री करणारा, विनयभंग असे तब्बल ९ गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार २९ वर्षीय शारुख शेरखान पठाण राहणार रवींद्र नगर वॉर्ड बल्लारपूर याची परिसरात सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली होती. Chandrapur criminal profile nine serious offences

महाराष्ट्र औद्योगिक संस्थांमध्ये क्रांतिकारी बदल

वर्षभरासाठी स्थानबद्ध

गुन्हेगार शारुख पठाण याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधित कारवाई पोलिसांनी केली मात्र तो कायद्याला जुमानत नव्हते. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृक्श्राव्य कलाकृती, विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सण १९८१ सुधारणा २००९, २०१५ अनव्ये प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्याकडे सादर केला असता त्यांनी प्रस्तावाची दखल घेत शारुख शेरखान पठाण ला १ वर्षाकरिता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश २४ जुलै रोजी पारित केला. शारुख पठाण ला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव ,, अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक विपीन इंगळे, सपोनि पठाण, पोलीस कर्मचारी मिलिंद आत्राम, स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सपोनि योगेश खरसाण, अरुण खारकर, सुधीर मत्ते, परिवरीश शेख, संजय वाढई, महिला पोलीस छाया निकोडे, उषा लेडांगे व अपर्णा मानकर यांनी केली.

Leave a Comment

+