"बलसागर भारत होवो!" निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पावर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया

February 01, 2026 by Prakash Hande

Budget 2026 for Farmers : चंद्रपूर - विश्वगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदीजी यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली केंद्रीय वित्तमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा नवभारताच्या आत्मविश्वासाचा, आर्थिक स्थैर्याचा आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट आराखडा आहे.“बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या राष्ट्रभावनेची ठळक प्रचिती देणारा हा अर्थसंकल्प असून भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत अग्रस्थानावर नेण्याचा दृढ संकल्प त्यातून दिसून येतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग, उद्योजक आणि देशाच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवत संतुलित आणि भविष्याभिमुख तरतुदी करण्यात आल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला जी भक्कम पायाभरणी दिली आहे, त्याचाच पुढचा निर्णायक टप्पा हा अर्थसंकल्प आहे. (विदर्भाच्या अपेक्षांवर पाणी, केंद्रीय अर्थसंकल्पावर माजी आमदार धोटे यांची प्रतिक्रिया)

 पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूकीवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, लॉजिस्टिक्स व शहरी पायाभूत सुविधा यासाठी भरीव तरतुदी करून रोजगारनिर्मितीला गती देण्याचा ठोस प्रयत्न करण्यात आला आहे. ‘विकसित भारत’ या संकल्पनेचा हा कणा ठरणार आहे.

कृषी व ग्रामीण विकास या क्षेत्रात देखील भरीव तरतुदी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सिंचन सुविधा, कृषी प्रक्रिया उद्योग, साठवण क्षमता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केलेल्या तरतुदी शेतकरीहिताचे ठोस प्रतिबिंब आहेत.

महिलांसाठी विशेष योजना, स्वयंरोजगार, बचत गट, स्टार्टअप्स आणि आर्थिक समावेशनासाठी दिलेले प्रोत्साहन हे ‘नारीशक्ती’ला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणारे पाऊल आहे.

युवक, शिक्षण व कौशल्य विकास यावर देखील भर देण्यात आला आहे. नवीन कौशल्ये, तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण, स्टार्टअप्स, संशोधन व नवोन्मेषाला चालना देणाऱ्या तरतुदी भारताच्या युवा शक्तीला जागतिक स्तरावर सक्षम करतील.

 उद्योग, स्टार्टअप्स व MSME क्षेत्राला देखील बळकटी देण्याचा प्रयत्न वित्त मंत्र्यांनी केला आहे. Budget 2026 for Farmers

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी सुलभ कर्ज, भांडवल उपलब्धता आणि उद्योगस्नेही धोरणे ही ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारी आहेत.

संरक्षण, तंत्रज्ञान व नवोन्मेष याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरण, संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. 

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला आर्थिकदृष्ट्या सबळ, सामाजिकदृष्ट्या समतोल आणि जागतिक स्तरावर प्रभावी बनवण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. केंद्रीय वित्त मंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, जबाबदार आणि दूरगामी परिणाम करणारा सर्व समावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची मांडणी नसून, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आत्मविश्वासपूर्ण संकल्प आहे.

मोदी सरकारच्या या विकासाभिमुख वाटचालीला देशवासीयांचा विश्वास आणि पाठिंबा निश्चितच मिळत राहील, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे

Leave a Comment

+