public property theft chandrapur : चंद्रपूर – शहरातील नागरी सुविधा आणि सौंदर्यीकरणासाठी वापरल्या गेलेल्या शासकीय मालमत्तेची सर्रास चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे. कोहिनूर ग्राउंडवरील वॉकिंग ट्रॅकसाठी वापरलेले पेव्हर्स आणि माता महाकाली महोत्सवाच्या वेळी सार्वजनिक व्यवस्थेसाठी टाकलेली काळी गिट्टी ही दोन्ही शासकीय मालमत्ता अर्बन एनव्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या खासगी कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावली असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. AAP complaint against waste management company
नरभक्षक वाघिणीनंतर बछडा जेरबंद
या प्रकरणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली असून, यामध्ये त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई, मालमत्तेची जप्ती, तसेच पोलीस तक्रार व FIR दाखल करण्याची विनंती केली आहे. kohinoor ground pavers stolen case
चोरीचा घटनाक्रम:
"महानगरपालिकेच्या मालकीची, सार्वजनिक वापरासाठी असलेली शासकीय मालमत्ता खासगी कंपनीने चोरून नेली हे गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे. ही केवळ चोरी नव्हे, तर नागरी सुविधा नष्ट करण्याचा आणि लोकांच्या पैशांची लूट करण्याचा प्रकार आहे. यामध्ये संबंधित अधिकारी आणि कंपनीतील उच्चपदस्थांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही," असे राईकवार यांनी सांगितले.
Powered by myUpchar
या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट पसरली असून, नागरिकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोहिनूर ग्राउंडवरील नागरिक आणि महाकाली मंदिर परिसरातील रहिवाशांनी यापूर्वीही मालमत्ता काढली जात असल्याची तक्रार केली होती, मात्र कारवाई करण्यात आलेली नव्हती. kohinoor ground pavers stolen case
सदर कंपनी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम करत असून, त्यांच्या विरुद्ध इतक्या गंभीर स्वरूपाचा आरोप होणे ही महापालिकेच्या देखरेखीतील हलगर्जीपणाचे स्पष्ट लक्षण आहे. यामुळे प्रशासनाची भूमिका आणि पारदर्शकता यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जर याप्रकरणी तातडीने कारवाई झाली नाही, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल आणि जनतेसोबत एकजूट होऊन जबाबदारांवर कठोर कार्यवाही होईपर्यंत लढा देईल, असा इशारा पक्षाने दिला आहे या वेळी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार , युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरे , महानगर संगठन मंत्री सतोष बोपचे ,महिला अध्यक्ष एड तबस्सुम शेख इत्यादि उपस्थित होते .
Leave a Comment