चंद्रपूर मनपा निवडणूक: काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २२ डिसेंबरला

January 17, 2026 by Prakash Hande

Congress Candidate Interview : चंद्रपूर | 20 डिसेंबर २०२५ {News३४ प्रकाश हांडे) - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकत्याच भाजपच्या तब्बल ६०० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या त्यानंतर आता २२ डिसेंबर रोजी कांग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या आयोजित करण्यात आल्या आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील सावकाराना जिल्हा प्रशासनाचा इशारा)

आगामी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक अर्ज दाखल केलेल्या सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या मुलाखती येत्या २२ डिसेंबर रोजी (सोमवार) दुपारी 2 वाजेपासून आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखती चंद्रपूर येथील दाताळा मार्गावरील जिजाऊ लॉन सभागृहात पार पडणार असून त्या दिवसभर चालणार आहेत.

या मुलाखती पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत घेण्यात येणार असून, यावेळी विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे, चंद्रपूर विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर, यांच्यासह पक्ष निरीक्षक व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. Congress Candidate Interview

चंद्रपूर शहरातील विविध प्रभागांतून निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या ज्यांनी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली दावेदारी सादर करावी, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

+