amit shah resignation demand : घुग्घूस : काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील मिनी स्वीटझरलँड म्हणून प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या जवळपास हिंदू धर्मीय पर्यटकांना धर्म विचारून आतंकवाद्याकडून गोळीबार करण्यात आला या भ्याड हल्ल्यात जवळपास 28 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. congress protest news today
त्या कंत्राटी कामगारांना मुनगंटीवार यांनी दिला न्याय
या भयाड हल्ल्याचा घुग्घूस शहर काँग्रेस तर्फे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात दिनांक 27 एप्रिल रोजी काँग्रेस कार्यालया समोरील चौकात पाकिस्तान पुरुस्कृत भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला व या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
निषेध आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, निम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है,
घोषणा दिल्या तसेच देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाच्या रक्षणाची जवाबदारी मोदी सरकारची असतांना ही भरदिवसा आतंकवादी देशाच्या सिमेत प्रवेश करतात धर्माच्या आधारे नागरिकांचे वर्गीकरण करतात व नेमून हिंदू बांधवांचे जीव घेतात या देशाला हेतूपूर्वक गृह युद्धात झोकण्याचा उघड षडयंत्र स्पष्ट या हत्याकांडातून दिसून येत आहे
ही पूर्णतः गृहखात्याचा बोगसपना असून गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली. home minister failure india
तसेच देशाच्या प्रधानमंत्री यांनी विदेशातून येऊन सर्वात आधी काश्मीरला जाणे आवश्यक असतांना ते बिहार येथे प्रचार सभेला गेले याचा ही काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करण्यात आला पुलवामा नंतर ही सर्वात भिषण व त्रासदायक हत्याकांड असल्यामुळे केंद्र शासनाने पाकिस्तान वर चुटूक चाटुक कारवाई न करता जन्माची अद्दल घडवावी अशी मागणी करण्यात आली. government failure in security
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, नकोडा माजी उप सरपंच हनीफ शेख,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख,एन. एस. यु. आय. अध्यक्ष आकाश चिलका, तालुका उपाध्यक्ष सिनू गुडला, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली,ज्येष्ठ नेते शेख शमिउद्दीन,बालकिशन कुळसंगे,महिला जिल्हा उपाध्यक्षा यास्मिन सैय्यद, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गाताई पाटील, ज्येष्ठ नेत्या संध्या मंडल,शिल्पा गोहिल,मंगला उगे, दिपक पेंदोर,देव भंडारी,सुनील पाटील, कुमार रुद्रारप, अरविंद चहांदे, निखिल पुनघंटी, अभिषेक सपडी, कपिल गोगला, सुरज मिश्रा,संदीप कांबळे,दिपक कांबळे,अंकुश सपाटे, रंजित राखुंडे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Comment