Modern fish market infrastructure : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेत अत्याधुनिक मच्छी मार्केट उभारण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने जलद कार्यवाही करावी हे मार्केट केवळ व्यवसायाच्या दृष्टीनेच नव्हे, तर स्वच्छता, सुविधा आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. यातून चंद्रपूरच्या मत्स्यव्यवसायीकांना आधुनिक सुविधा मिळणार असुन या कामात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे.
कृषी वीज पंप जोडणीवरून खासदार धानोरकर आक्रमक, आंदोलनाचा इशारा

मत्स्य व्यवसायिकांना शीतगृह, पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा यांसारख्या सुविधा व्यवस्थित मिळाव्यात. विक्रेत्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळावे, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि हा व्यवसाय अधिकाधिक लोकांसाठी रोजगारनिर्मिती करणारा ठरावा, ही आमची भूमिका असून प्रशासनाने या कामाच्या गतीला प्राधान्य द्यावे आणि अंमलबजावणी वेळेत पूर्ण व्हावी हा प्रकल्प म्हणजे केवळ मच्छी बाजार नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि चंद्रपूरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा उपक्रम आहे असल्याचे या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून सर्व विभागानी समन्वय ठवेत हे काम वेळेत पूर्ण करत उत्तम दर्जाचे करण्याच्या सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. या बैठकीत संबधित विभागाच्या अधिका-यांची आणि मच्छी विक्रेत्यांची उपस्थिती होती.
Leave a Comment