chandrapur illegal moneylenders police action : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारांचा सुळसुळाट असून या सावकारांच्या जाचाला आजपर्यंत अनेक नागरिक बळी पडत आहे, अश्याच काही प्रकरणात चंद्रपुरातील ८अवैध सावकारांवर विविध कलमांव्ये दुर्गापूर व रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरात १७५ किलो प्लास्टिक जप्त
ऋषिराज सोमाणी, रोहित सोमाणी, सुनीता राधेश्याम सोमाणी, राधिका सोमाणी, अजय हर्षदारय संघवी, प्रीती मनोज संघवी, स्तुती ऋषिराज सोमाणी आणि अशोक मुलजीभाई ठक्कर.
चंद्रपूर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा व चंद्रपूर पोलिसांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे कि शेतजमीन, प्लॉट, घर किंवा जंगम मालमत्ता अवैध सावकाराकडून बळकावली असल्यास त्यांनी लेखी तक्रार व आर्थिक गुन्हे शाखा दुर्गापूर मध्ये उपस्थित राहून द्यावी.
सावकार विरुद्ध गोपनीय माहिती द्यायची असल्यास तक्रारकर्त्याचे किंवा माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अधिक माहिती द्यायची असल्यास आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि सचिन यादव मोबाईल क्रमांक ९५९४०८३१४१ वर संपर्क साधावा.
Leave a Comment