तर सामूहिक राजीनामे देणार; कांग्रेसमधील वाद टोकाला

January 21, 2026 by Prakash Hande

Wadettiwar Dhanorkar Conflict : चंद्रपूर २१ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिका मध्ये महापौर कोण होणार यावरून कांग्रेस पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. बहुमतासाठी 34 जागेची गरज आहे, कांग्रेस पक्षाला 30 जागेवर विजय मिळाला असून उबाठा व वंचित आघाडीला सोबत घेतल्यास कांग्रेसचा मनपा मध्ये महापौर बसू शकतो. (चंद्रपूर मनपात महापौर कुणाचा)
मात्र कांग्रेस पक्षाची वाट पक्षातील नेत्याने अडवून ठेवली आहे, कांग्रेस नेते वडेट्टीवार यांनी आधीच आपले  समर्थक नगरसेवकांना जवळ ठेवले कारण आपला समर्थक मनपाचा महापौर व्हावा अशी त्यांची इच्छा आहे.
जिल्ह्यात धानोरकर-वडेट्टीवार वाद हा काही नवा नाही, राजकारणात एकमेकांना खाली पाडण्याचे काम दोन्ही गटाने केले आहे. Wadettiwar Dhanorkar Conflict

मात्र सत्तेच्या जवळ असूनही कांग्रेस पक्षातील कुरघोडी मुळे भाजप मनपा मध्ये महापौर बसवू शकणार अशी चिन्हे आहे, सध्यातरी भाजप संधीची वाट बघत आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नाराजी व्यक्त करीत कांग्रेस पक्षाच्या चिन्हावरून निवडून आलेल्या नगरसेवकांना असे पळविणे योग्य नाही, यावर तोडगा न निघाल्यास पक्षाला आमची गरज नाही असे समजून आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा धानोरकर यांनी दिला आहे.
कांग्रेस पक्षात होत असलेल्या संघर्षावर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दखल घेतली असून आज दोन्ही नेत्यांची बैठक घेत वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करणार आहे.

अनेक वर्षांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात कांग्रेस पक्ष सत्तेच्या जवळ आला आहे, मात्र कांग्रेस नेत्यांमुळे पक्ष सत्तेपासून दुरावला जाऊ शकतो, असे होऊ नये यासाठी पक्षातील वरीष्ठ नेते आज नागपुरात वडेट्टीवार-धानोरकर यांची समजूत काढत गटनेता ठरविणार असल्याची माहिती आहे. 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत निघणार असून हा संघर्ष पुन्हा वाढणार की शमणार हे आज स्पष्ट होणार.

Leave a Comment

+