Chandrapur crime news latest update । मौजमजा करण्यासाठी चंद्रपुरात ऑनलाईन जबरी चोरी, अल्पवयीन गुन्हेगारी वृत्तीचा चंद्रपुरात धुमाकूळ

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur crime news latest update

Chandrapur crime news latest update ; चंद्रपूर - जिल्ह्यातील गुन्हेगारी अनियंत्रित झाली असून दररोज गंभीर गुन्ह्याने चंद्रपूर हादरत आहे, विशेष म्हणजे गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असल्याने भविष्यात मोठे गुन्हे करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकप्रतिनिधी असावा तर असा

चंद्रपुरातील पडली पोलीस स्टेशनच्या हद्दीत १६ जून रोजी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी ५० वर्षीय उमेश महंत साह हे भद्रावती च्या दिशेने आपल्या दुचाकीने जात होते. इतक्यात काही युवकांनी त्यांना अडवीत त्यांच्या मोबाईलवरून तब्बल ९१ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. juvenile involvement in cyber crime

अचानक घडलेल्या या घटनेमुळे साह घाबरून गेले मात्र त्यांनी हिंमत करीत या घडलेल्या प्रकाराबाबत पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०९ (४), ३, (५) अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. highway robbery incidents

How Rs.91,000 Was Stolen Via Mobile Transfer

साखरवाही फाट्याजवळ अनोळखी ४ युवकांनी फिर्यादी साह यांना रस्त्यात अडवून त्यांचा मोबाईल हिसकावीत अज्ञात इसमाच्या नावे ९१ हजार रुपये ट्रान्सफर केले. राज्य महामार्गावर घडलेल्या या गुन्ह्याची उकल करण्याचे आवाहन पडोली पोलिसांसमोर होते, मात्र २४ तासात त्यांनी गुन्ह्याची उलगडा केला.

How Police Cracked the Case in 24 Hours

पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिकदृष्ट्या तपास करीत या प्रकरणातील आरोपी मध्ये २ विधिसंघर्ष बालक सह ऋषिकेश आंबोलकर व अनुज महाजन याना अटक केली.

आरोपीकडून रोख ४४ हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरी केलेल्या पैश्यातून खरेदी केलेले कपडे सह ४ मोबाईल २ असा एकूण २ लक्ष ८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.

चंद्रपुरात आजपर्यंत अनेक गंभीर गुन्हे घडले व घडत आहे यामध्ये अनेक अल्पवयीन मुले आपला छंद व नशेचे व्यसन पूर्ण करण्यासाठी अश्या गुन्ह्यात थेट सहभाग दर्शवित आहे. विशेष बाब म्हणजे चंद्रपुरात घडलेल्या दोन गंभीर गुन्ह्यात पोलिसांच्या मुलांचा सहभाग होता.

https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=P80S0CH776QbIXJo

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात सपोनि योगेश हिवसे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील विनोद बानकर, कोमल मोहजे, प्रतीक हेमके, धीरज भोयर व सुचिता उमरे यांनी केली.

Leave a Comment

+