शिवापूर शेतशिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; कोरपना पोलिसांची धाड

January 17, 2026 by Prakash Hande

Cock Fighting Betting : कोरपना (२९ डिसेंबर २०२५) - तालुक्यातील मौजा शिवापूर गावातील शेतशिवारात कोंबडयाच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या ३ बहाद्दरांना कोरपना पोलिसांनी अटक करीत ३ लक्ष ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (मूल पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश तस्करी)

चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी एकांत ठिकाणी आजही सुरु आहे, अश्याच एकांत ठिकाणी काही जुगार बहाद्दरांनी कोंबड्यांची झुंज सुरु केला, कोंबड्याच्या पायांना कात्या बांधून त्यावर पैसे लावण्याचा प्रकार कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजा शिवापूर मधील शेतशिवारात सुरु असल्याची माहिती कोरपना पोलिसांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवापूर गावातील शेतशिवारात धाड मारली असता त्याठिकाणी आरोपी गजू आत्राम, दौलत पिंपळशेंडे व देवराव कोडापे यांना अटक करीत त्यांच्या ताब्यातील ३ नग कोंबडे, तीन कात्या व ७ मोटारसायकल असा एकूण ३ लक्ष ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काही आरोपीना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. Cock Fighting Betting

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोउपनि देवानंद केकन, पोलीस कर्मचारी बळीराम, नामदेव, साटव, लक्ष्मण व दीपक यांनी केली.

Leave a Comment

+