police mock drill in temple : चंद्रपूर - भविष्यातील संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपूर पोलीस दलाकडून आज (२४ मे) श्री माता महाकाली मंदिर परिसरात "दहशतवादी हल्ला आणि ओलीस मुक्तता" यावर आधारित रंगीत तालीम घेण्यात आली. या तालिमीत हल्ला झाल्यास पोलीस यंत्रणा कशी प्रतिसाद देईल आणि ओलीस बनवलेल्या नागरिकांची सुटका कशी केली जाईल, याचे अत्यंत शिस्तबद्ध प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. how police handle terrorist attacks
चंद्रपुरात आमदार-खासदार यांच्यात सुरु झाली श्रेयवादाची लढाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू यांच्या नेतृत्वात पार पडली.
दुपारी २ वाजता मंदिर परिसरात चार दहशतवाद्यांनी शस्त्राचा धाक दाखवून भाविकांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलीस कंट्रोलरूमला मिळाली. त्वरित प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री योगेश्वर पारधी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विविध पोलिस पथकांना रवाना केले. how police conduct rescue operation
या वेळी ATB, QRT, RCP, BDDS, K9, C-60, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, पोलीस रुग्णालय वैद्यकीय पथक इत्यादी सर्व यंत्रणा काही क्षणांत घटनास्थळी दाखल झाल्या.
अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी ताबा घेत तंतोतंत नियोजनानुसार सर्व पथकांना समन्वयात ठेवत कोणतीही जीवितहानी न होता प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पूर्ण केले. दहशतवाद्यांचा "खात्मा" करीत ओलीस बनवलेले सर्व नागरिक सुखरूपपणे वाचवले गेले.

ही तालीम यशस्वी करण्यासाठी पुढील अधिकाऱ्यांचे विशेष योगदान होते:
तसेच पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर व रामनगर, तसेच संबंधित सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट समन्वय ठेवून प्रात्यक्षिक यशस्वी केले.

या काळात मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली होती. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता आणि सार्वजनिक जागांवर जनजागृतीही करण्यात आली.
Leave a Comment