Bengali community chandrapur : आमदार जोरगेवार यांचा बंगाली समाजबांधवांनी केला सत्कार

January 17, 2026 by Prakash Hande

Bengali community chandrapur

Bengali community chandrapur : बंगाली समाज हा आपल्या संस्कृती, शिक्षण, आणि व्यावसायिक कार्यात मोठा ठसा सोडणारा समाज आहे. आपला समाज नेहमीच आदर्श आणि प्रेरणा देणारा असून, प्राथमिकतेने बंगाली समाजाच्या अडचणी सोडविण्याचे आपले प्रयत्न राहणार आहेत. आपण एकत्रित प्रयत्नांनी समाजाला अधिक समृद्ध आणि सशक्त बनवू, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) यांनी केले.

श्याम नगर येथे बंगाली समाजाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, संदीप आवारी,मनोज पाल,  विश्वजित शाह, सविता दंडारे, गुरुप्रीत मंडळ, तापोष रॉय, विश्वजित मंडळ आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी दिली तर पालकांवर होणार कारवाई

यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, बंगाली कॅम्प, श्याम नगर या भागात बंगाली समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या भागाचा विकास करण्यासाठी मोठा निधी आपण येथे उपलब्ध करून दिला आहे. हा शहराचा शेवटचा भाग असल्याने नेहमी दुर्लक्षित राहिला, मात्र आपण निवडून आल्यानंतर या भागाच्या विकासाला प्राथमिकता दिली असल्याचे ते म्हणाले.

आपल्या समाजातील प्रत्येक सदस्यासाठी आपल्या पिढीने प्रगती साधावी, समाजातील प्रत्येक व्यक्ती सक्षम होईल,  प्रत्येकाला समान संधी मिळेल आणि त्यातून आपला समाज आणखी प्रगती साधेल. माझ्या या सत्कारासाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे.

या सन्मानाने मला समाजहिताचे कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे. शेवटच्या घटकांपर्यंत न्याय आणि सुविधा पोहोचवण्याचे, तसेच प्रत्येक व्यक्तीला उत्कृष्ट शिक्षण आणि रोजगार संधी देणे हे आमचे ध्येय राहणार असल्याचे ते म्हणाले.

 बंगाली समाज हा केवळ एक व्यावसायिक समाज म्हणूनच नाही, तर त्याच्या साहित्य, कला, शास्त्र आणि सांस्कृतिक योगदानामुळेही प्रसिद्ध आहे. आपल्यामध्ये असलेली शिक्षणाची आवड, मेहनत करण्याची कुवत आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला समाविष्ट करण्याची क्षमता हे आपल्या समाजाची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment

+