megablock on SECR Nagbhid Brahmpuri track : चंद्रपूर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (SECR) नागभीड-ब्रम्हपुरी दरम्यान रेल्वे रुळाखाली गोसीखुर्द कालव्याचे काम आज, १५ जून रोजी हाती घेतले आहे. यामुळे बल्लारशाह-नागभीड-गोंदिया रेल्वेमार्गावर सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, म्हणजेच ८ तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे एकूण ७ मेमू पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर या मार्गावरून धावणाऱ्या मालगाड्या बल्लारशाह-सेवाग्राम-नागपूर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. SECR mega block Gosekhurd canal widening June 2025
रात्री चोरी सकाळी अटक, भद्रावती मध्ये नेमकं काय घडलं?
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा बल्लारशाह-गोंदिया हा अत्यंत व्यस्त रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर मेमू पॅसेंजर गाड्या, मालगाड्या आणि सुपरफास्ट गाड्या धावतात. मात्र, रेल्वेने आज, १५ जून रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ८ तासांच्या मेगाब्लॉकची घोषणा करून या मार्गावरील सर्व प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. याचा परिणाम मालगाड्यांच्या वाहतुकीवरही होणार आहे. freight trains diverted Nagpur Sevagram route during track closure
याचप्रमाणे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या मालगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या कालावधीत सर्व मालगाड्या बल्लारशाह येथून सेवाग्राम-नागपूर मार्गे गोंदियाकडे रवाना होतील.
भद्रावतीमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचार
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभीड तसेच इतर तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गोसीखुर्द कालव्याचे विस्तारीकरण सुरू आहे. आज, १५ जून रोजी नागभीड-ब्रम्हपुरी रेल्वेमार्गाखालील रुळांमधून हा कालवा जाणार आहे. यासाठी रुळांवरील जुने बांधकाम वेगळे करून युद्धपातळीवर कालव्याचे काम केले जाणार आहे. म्हणूनच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने या मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वेने प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर आज प्रवास करणे टाळावे किंवा पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.
Leave a Comment