law and order Police Notification : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते ७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३६ चे पोटकलम 'अ' ते 'फ' लागू करण्यात आले आहे.
लोकसभा अधिवेशन : धानोरकर यांच्या प्रश्नावर उघड झाले शालेय शिक्षणाचे दुर्दैव
या कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक निर्बंध आणि निर्देश देण्याचे अधिकार सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. law and order Police Notification
या निर्बंधांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
या कालावधीत सभा, मिरवणूक आयोजित करण्यासाठी, वाद्य वाजविण्यासाठी, लाऊडस्पीकर वापरण्यासाठी किंवा मिरवणुकीचा रस्ता व वेळ निश्चित करण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे अंमलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.
Leave a Comment