yuva sena office | चंद्रपुरात युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

January 17, 2026 by Prakash Hande

yuva sena office

yuva sena office : शिवसेना प्रणित युवासेना चंद्रपूर जिल्ह्यात संघटन बांधणीत सतत पुढे जात आहे.
आज हजारोच्या वर युवावर्ग युवासेनेला पसंती दर्शवित आहे.

2 जानेवारी रोजी ठाकरे गट शिवसेना प्रणित युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख आमदार संजय देरकर व युवासेना कोर कमिटी सदस्य हर्षलदादा काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. (Yuvasena chandrapur)

चंद्रपुरात 50 वर्षीय नागरिक गांजाविक्री साठी येतात तेव्हा

आमदार देरकर यांनी उदघाटन प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतील युवक हा पक्षबांधणीत अविरत पुढे जाणार व जिल्ह्यातील युवा वर्गाच्या समस्या सोडविण्यात अग्रेसर असेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

yuva sena chandrapur

आयोजित युवासेना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उदघाटन प्रसंगी वरोरा-भद्रावती शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखडे, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक संदीप रियाल पटेल, युवासेना सहसचिव जयसिंग राजे भोसले यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

+