aam aadmi party on rto scam : चंद्रपूर, २१ जुलै २०२५: लकडकोट (महाराष्ट्र-तेलंगणा सीमा) येथील आरटीओ चेकपोस्टवरील कथित गैरकारभाराविरोधात आम आदमी पक्षाने (आप) कंबर कसली आहे. दिनांक १६ जुलै २०२५ रोजी 'आप'चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख आरटीओ अधिकारी श्री. किरण मोरे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. आरटीओ चेकपोस्टवर सुरू असलेल्या अपारदर्शक आणि बेकायदेशीर वर्तनावर आप ने यावेळी आक्षेप घेतला आहे. rto checkpost harassment issues
आमदार जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम थांबविले
या निवेदनात 'आप'ने अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत, ज्यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:
'आप'च्या निवेदनावर आरटीओ प्रमुख श्री. किरण मोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आरटीओ मोरे यांनी आम आदमी पक्षाला ४ दिवसांत लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे.
या भेटीनंतर 'आप'ने चंद्रपूरच्या नागरिकांना आणि विशेषतः ट्रक चालक, ट्रान्सपोर्टर व पत्रकारांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. "लकडकोट आरटीओ चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. ट्रक चालकांकडून त्यांच्या वाहनाच्या चाकांनुसार 'एन्ट्री'च्या नावाखाली पैसे घेतले जातात," असा आरोप 'आप'ने केला आहे.
'आप'ने नागरिकांना आवाहन केले आहे की, ट्रक चालक, नागरिक, ट्रान्सपोर्टर, पत्रकार यांनी मोबाईल व्हिडिओ चालू ठेवावा. जेव्हा पैसे मागितले जातात, तेव्हा ते रेकॉर्ड करावे आणि ते सोशल मीडियावर किंवा आम आदमी पार्टीकडे शेअर करून भ्रष्टाचार उघड करावा.
"आता भ्रष्टाचाराविरुद्ध लढा फक्त नेत्यांनी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने उभा राहून द्यावा," असे 'आप'ने म्हटले आहे.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान 'आप'चे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, ज्यात सुनील मुसळे (प्रदेश जॉईंट सेक्रेटरी), मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष), योगेश गोखरे (शहराध्यक्ष), संतोष बोपचे (शहर संघटनमंत्री), दीपक बेरशेट्टीवार (जिल्हाध्यक्ष, शेतकरी आघाडी), एड. तबस्सुम शेख (अध्यक्ष, महिला आघाडी - शहर), राजकुमार नगराळे (जिल्हा कोषाध्यक्ष), सतीश रासावर (सहकोषाध्यक्ष), एकनाथ हांडेकर (अध्यक्ष, शिक्षक आघाडी) आणि इतर कार्यकर्ते यांचा समावेश होता. aam aadmi party on rto scam
'आप'ने स्पष्ट केले आहे की, आरटीओच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा आता जनतेच्या पुढाकारातून दिला जाईल. चेकपोस्टवरील बेकायदेशीर वसुली तात्काळ बंद झाली पाहिजे आणि दोषींवर शिस्तभंगात्मक कारवाई झाली पाहिजे, अशी 'आप'ची मागणी आहे.
"सत्ता कोणाच्याही हाती असली, तरी अन्याय करणाऱ्यांवर आम्ही आवाज उठवत राहू. आता प्रत्येक ट्रक ड्रायव्हरच ‘कॅमेरा’च्या माध्यमातून यंत्रणेला आरसा दाखवेल!" असे 'आप'चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले.
Leave a Comment