चंद्रपूर पोलिसांची ‘ऑपरेशन शोध’ मोहीम यशस्वी; 14 वर्षीय मुलगी व 13 वर्षीय मुलाचा शोध

January 17, 2026 by Prakash Hande

Operation Shodh Chandrapur police action : चंद्रपूर २६ नोव्हेम्बर (News३४) - चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन बालकांसंदर्भात अनुचित प्रकार घडू नये याकरिता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन शोध मोहीम राबवली, या मोहिमेत दोन अल्पवयीन बालकांचा शोध लावत त्यांच्या कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले.

५ वर्षांपासून तो पोलिसांना चकवीत होता, स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती सापडला अन...

पहिल्या कारवाईत चंद्रपुरातील १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार रामनगर पोलिसांकडे प्राप्त झाली होती. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा गुन्हा रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल दाखल झाल्यावर पोलिसांनी गांभीर्याने तपासाला सुरुवात केली. सदर मुलीला एका मुलाने पळवून नेल्याची बाब उघडकीस आल्यावर पोलिसांनी पळवून नेणाऱ्या आरोपी मुलासह अल्पवयीन मुलीला परभणी जिल्ह्यातून शोध घेत मुलीला आईच्या ताब्यात देण्यात आले.

chandrapur police missing child rescue
13 वर्षीय मुलाचा यशस्वी शोध

दुसऱ्या प्रकरणात चंद्रपुरातील १३ वर्षीय बालक बेपत्ता झाला होता, रामनगर पोलिसात आई ने तक्रार दिल्यावर पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेत त्या बालकाचा अवघ्या ८ दिवसात शोध लावत त्याला नैनिताल राज्य उत्तराखंड मधून आणले व त्याला आईच्या ताब्यात देण्यात आले. Operation Shodh Chandrapur police action

या दोन्ही कारवाईत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि शिवाजी नागवे, पोउपनि कवडू गेडाम, कैलास खोब्रागडे, पोलीस कर्मचारी अहमद शेख, देविदास राठोड, तिरुपती जाधव, हेमंत बावणे, महेश खोके, ज्योती गायकवाड यासह सायबर पोलीस स्टेशन यांचा सहभाग होता.

Leave a Comment

+