Chandrapur BJP Rally : चंद्रपूर ८ जानेवारी - आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप - शिवसेना - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे आज चंद्रपूर दौऱ्यावर येणार होते मात्र मुंबई मध्ये गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा असल्याने चव्हाण यांची जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकुम येथील चवरे मैदान येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा दुपारी ३ वाजता सुरू होणार होती. (विजय वडेट्टीवार यांची एंट्री आणि बंडोबा थंड)
महायुतीच्या प्रचारात नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या सभेत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक धोरणांवर प्रकाश टाकत नागरिकांशी थेट संवाद साधणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार्या विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीची भूमिका आणि पुढील विकासदृष्टी ते यावेळी मांडणार होते.
दुपारी 2.30 वाजता मोरवा विमानतळ येथे त्यांचे आगमन होणार होते. तर 3 वाजता सभेला सुरवात होणार होती. या जाहीर सभेद्वारे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येणार होते. शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा, घरपट्टे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, रोजगार आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही प्रदेशाध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. या सभेसाठी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार होते मात्र दौरा रद्द झाला. जाहीर सभेची तारीख कळविण्यात येणार अशी माहिती भाजप चंद्रपूर च्या वतीने देण्यात आली आहे.
Leave a Comment