पाच पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची निसर्गात मुक्तता

January 17, 2026 by Prakash Hande

Vulture Conservation : चंद्रपूर ३१ डिसेंबर - महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांचे संयुक्त विद्यमाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील जटायू संवर्धन प्रकल्पातील पाच पांढऱ्या पाठीच्या गिधाडांना(White rumped Vulture) 30 डिसेंबर रोजी निसर्गात मुक्त करण्यात आले. या कार्यक्रमात श्री. प्रवीणसिंह परदेशी, अध्यक्ष BNHS यांच्या शुभहस्ते गिधाड प्री रिलीज एवियरी चे दार उघडून निसर्गात यशस्वीपणे मुक्त करण्यात आले. (भाजपने तिकीट नाकारले, अजय सरकार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात)

 

सदर गिधाडे हरियाणा राज्यातील पिंजोर येथून एप्रिल २०२५ मधे आणून प्री रिलीज एवियरी मधे सोडण्यात आले. सदर गिधाडांना सैटलाइट(दोन गिधाडांना)व gsm टैग (तीन गिधाडांना) लावण्यात आले. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल व सदर बाब गिधाडांच्या अभ्यासासाठी महत्वपूर्ण ठरेल.

 

गिधाडे ही पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाची पक्षी प्रजाती असून परिसंस्थेचा समतोल राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मात्र मागील काही वर्षांत विविध कारणांमुळे गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ही बाब लक्षात घेता गिधाड संवर्धनासाठी जटायू संवर्धन प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गत संरक्षण, पुनर्वसन व निसर्गात पुनर्स्थापनाचे कार्य केले जात आहे. Jatayu Conservation

 

बोटेझरी येथे कार्यक्रमात वनविभागाचे अधिकारी डॉ जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम मुंबई, डॉ प्रभू नाथ शुक्ल, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ता.अं.व्या. प्रकल्प, श्री.अनिरुद्ध ढगे सवसं, श्री विवेक नातू सवसं, श्री रुंदन कातकर वन परिक्षेत्र अधिकारी, कोळसा, श्री मनन तसेच इतर बायोलॉजिस्ट व कोळसा परिक्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे गिधाड संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

Leave a Comment

+