चंद्रपूर मनपा निवडणूक: युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांचा एमईएल प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल

January 17, 2026 by Prakash Hande

Youth Leader Vikrant Sahare : चंद्रपूर ३१ डिसेंबर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी उडी मारत शेवटच्या दिवशी उमेदवारी प्रभाग क्रमांक ३ एमईएल मधून अर्ज दाखल केला. सहारे यांनी अ गट अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे. (बंगाली कॅम्प प्रभागातून अजय सरकार पुन्हा अपक्ष)

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आपले विविध प्रभागात उमेदवार उभे केले आहे, शिवसेना चंद्रपूर मनपा निवडणूक वंचित बहुजन आघडी पक्षासोबत युती करून लढत आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनेक नागरिकांच्या अनेक समस्या आहे.

समस्या सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र त्याचे निराकरण अद्यापही झाले नाही. या सर्व समस्या निवडून आल्यावर मार्गी लावू असा निर्धार विक्रांत सहारे यांनी केला आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर प्रभागातील नागरिकांनी सहारे यांना मनपा निवडणुकीत सहभाग घेण्याचा आग्रह केला होता. नागरिकांच्या आग्रहाला मान देत सहारे यांनी निवडणुकीच्या मैदानात आपली उपस्थिती दर्शविली आहे. Youth Leader Vikrant Sahare

विक्रांत सहारे हे मागील अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात आहे, राजकीय वातावरण बदलले, पक्ष फुटला मात्र त्यानंतरही सहारे यांनी निष्ठावंत म्हणून पक्षासोबत उभे राहिले. त्यांनी आजवर अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेत अनेक तरुण वर्गाचे प्रश्न सोडविले आहे. युवा वर्गात आधीच सहारे हे लोकप्रिय आहे. आता प्रभागातील जनतेची सेवा करीत आपला प्रभाग चंद्रपूर मनपाच्या इतिहासात विकसनशील करणार असा निर्धार त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यास आपण प्रथम प्राधान्य देऊ अशी प्रतिक्रिया सहारे यांनी दिली आहे.

Leave a Comment

+