ब्रह्मपुरी २० जानेवारी - मागील ४ वर्षांपूर्वी वैभव संगमावर यांनी त्यांच्या गोडाऊनच्या खुल्या जागेमध्ये ठेवलेला १५०० मीटर लांबीचा १९ कोर ४ एमएम केबल पैकी ४०० मीटर केबल १० जानेवारी २०२६ रोजी चोरी गेला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्यावर याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहे. (किराणा सहित वाहन चोरीला, चंद्रपूर पोलीस पोहोचली मध्यप्रदेशात)
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये केबल चोरी ची तक्रार प्राप्त झाली, याबाबत वैभव संगमावर यांनी फिर्याद दिली कि १५०० मीटर लांबीच्या केबलपैकी ४०० मीटर केबल चोरी गेला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली मधील ३५ वर्षीय नागेश नाना कुंभारे याने महिला साथीदारासोबत ब्रह्मपुरी मध्ये येत केबल चोरी केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
पोलिसांनी गडचिरोली मध्ये आरोपी कुंभारेला ताब्यात घेत त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी जाळलेल्या केबलचा ६१ किलो तांबा किंमत ६१ हजार रुपयांचा मिळून आला व गुन्ह्यात वापरली चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात सपोनि मनोज खडसे, पोलीस कर्मचारी मुकेश गजबे, वशिष्ठ रंगारी, निलेश तुमसरे, प्रवीण भिवगुडे , इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार व शिवाली कांबळे यांनी केली.
Leave a Comment