गोंडवाना विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरेंचा अध्यासन केंद्र सुरू होणार, सिनेट सदस्य बेलखेडे यांचा पुढाकार

January 20, 2026 by Prakash Hande

Prabodhankar Thackeray : चंद्रपूर २० जानेवारी - गोंडवाना विद्यापीठात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे अध्यासन केंद्र सुरु होणार आहे, हे केंद्र विद्यापीठात सुरु व्हावे यासाठी सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी पुढाकार घेतला. (हे हि वाचा - महापौर कांग्रेसचाचं - विजय वडेट्टीवार)

महाराष्ट्र ही प्रबोधनाची दीर्घ परंपरा लाभलेली भूमी आहे या भूमी अनेक संत महापुरुष होऊन गेले ज्यांनी केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर या देशातील व जगभरातील लोकांना चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम केलं. मानवी परंपरा प्रथा यांच्या विरोधात संघर्ष करत समतेचा बीज पेरण्याचं महान काम केलं. प्रबोधनाच्या अशाच परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे केशव सिताराम ठाकरे. या देशातील बहुजन समाजाला रुढीपरंपरांच्या शोषणातून मुक्त करण्यासोबतच संयुक्त महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेच्या चळवळीत ज्यांनी अग्रक्रमाने भाग घेतला व इथल्या सर्वसाधारण कष्टकरी, कामकरी वर्गाचा न्याय हक्काचा लढा मजबूत केला.

त्यांनी अनेक विषयावर प्रकटपणे आपले मत मांडले त्यामुळेच त्यांना महाराष्ट्रातील जनतेने प्रबोधनकार ही पदवी बहाल केली. आपल्या भाषणातून व वृत्तपत्रे लेखनातून वाईट गोष्टींवर प्रहार करत चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करण्याचे महान कार्य केले. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक आहे त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत राहतील विद्यार्थी शिक्षक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठात "प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे" अध्यासन सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव प्रा निलेश बेलखेडे यांनी मांडला व  या अध्यासन केंद्राचे महत्व पटवून दिले.यावेळी विद्यापीठ कुलगुरू, प्र. कुलगुरू आणि कुलसचिव यांच्यासह सर्व अधिसभा सदस्यांनी यावर एकमताने मंजुरी देऊन सदर ठराव पारित केला त्यामुळे आता गोंडवाना विद्यापीठात प्राध्यापक, विद्यार्थ्यांपर्यंत प्रबोधनकार ठाकरे यांचे  कार्य, विचार पोहोचणार असून या करिता सर्वांच्या सहकार्याबद्दल विद्यापीठ सिनेट सदस्यप्रा. निलेश बेलखेडे यांनी आभार व्यक्त केले आहे.

1 Comments

3 months ago

खूप छान निलेश. अभिमान आहे तुझा

Leave a Comment

+