Voters Angry at Candidates : चंद्रपूर ९ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून उमेदवार निवडून यावा याकरिता सर्वच राजकीय व अपक्ष उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पण काही ठिकाणी माजी नगरसेवकांना प्रभागातील नागरिक कामावरून जाब विचारत आहे. असाच एक प्रसंग शहरातील जटपुरा प्रभाग क्रमांक 7 मध्ये घडला. (आमदार जोरगेवार प्रचार मैदानात)
महायुतीचे उमेदवार छबु वैरागडे, प्रमोद क्षीरसागर, रवि लोणकर व भाग्यश्री हांडे या जलनगर भागात प्रचार करीत असताना एका महिलेने माजी नगरसेविका व उमेदवार छबु वैरागडे यांना जाब विचारला की आमच्या घरी साप निघाला असता आम्ही आपल्याशी संपर्क केला मात्र मी मिटिंग मध्ये आहो असे म्हणत फोन कट केला.
आमच्या समस्या बाबत आपल्याला सांगितले तर तुमचं उत्तर मी मिटिंग मध्ये आहे असेच असते मग जनतेच्या समस्या सोडविणार कोण असा प्रश्न त्या महिलेने उपस्थित केला. Voters Angry at Candidates
प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या पूर्ण व्हाव्या याकरिता नागरिक आपला एक प्रतिनिधी नगरसेवक म्हणून निवडतात मात्र तेच नगरसेवक जेव्हा जनतेची कामे करीत नाही तर मतदान कुणाला करायचे असा प्रश्न या प्रसंगावरून उपस्थित झाला आहे.
महिलेच्या प्रश्नावर सर्वच उमेदवार निरुत्तर झाले, काही क्षणात प्रचार रॅली पुढे निघाली.
चंद्रपूर मनपा निवडणुकीत आधीच भाजपात अंतर्गत युद्ध सुरू आहे, उमेदवार व एबी फॉर्म वरून चांगलाच गोंधळ उडाला होता, आता प्रचाराच्या वेळी मतदार उमेदवारांचा गोंधळ उडवीत असल्याचे चित्र दिसत आहे.
Leave a Comment