चंद्रपुरात भाजपच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण

January 17, 2026 by Prakash Hande

violence in elections : चंद्रपूर दि. १५ जानेवारी 2026 - बुधवारी रात्री सुमारे 8.40 वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात धक्कादायक घटना घडली. बंगाली कॅम्पमधील अपक्ष उमेदवाराने भाजपच्या महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (एमईएल प्रभागात विक्रांत सहारे यांच्या प्रचाराची चर्चा)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला कार्यकर्ती ऑटोमध्ये बसलेली असताना अपक्ष उमेदवाराने महिलेच्या साडीला व केसांना धरून जबरदस्तीने तिला ऑटोमधून बाहेर ओढले. यानंतर रस्त्यावरच तिला मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात महिला कार्यकर्ती जखमी झाली असून तिला तात्काळ शासकीय दवाखान्यातील आपत्कालीन (इमर्जन्सी) वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे बंगाली कॅम्प परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अपक्ष उमेदवार यांच्या कथित गुंडगिरीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “बंगाली कॅम्पची जनता अखेर किती दिवस ही दादागिरी सहन करणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. violence in elections

दरम्यान, संबंधित घटनेबाबत पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच महिला कार्यकर्तीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Comment

+