कंबोडिया ते तामिळनाडू; चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात धक्कादायक माहिती

January 17, 2026 by Prakash Hande

Illegal Kidney Transplant : चंद्रपूर ३१ डिसेंबर - राज्याला हादरविणाऱ्या किडनी विक्री प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला, तामिळनाडू मधील स्टार किम्स हॉस्पिटल चे संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी व दिल्ली मधील डॉ. रविंद्रपाल सिंग यांचं नाव या गुन्ह्यात आलेलं आहे. देशांतर्गत झालेल्या अवैध किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया या दोघांनी केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन यांनी दिली आहे. (कर्ज साडेआठ लाख रुपये सावकाराने वसूल केले ३१ लाख रुपये)

नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकाराकडून १ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले होते. १ लाखाचे कुडे यांनी ४८ लाख रुपये दिल्यावर सुद्धा सावकारांचा जाच काही संपला नाही, त्या जाचाला कंटाळून रोशन कुडे यांनी ऑनलाईन किडनी विक्री करणाऱ्या ग्रुपला जॉईन होत आपली किडनी विकली, त्याला किडनीचे ८ लाख रुपये मिळाले होते, सदर पैसे सावकाराना दिल्यावर सुद्धा त्रास वाढत गेला अखेर रोशन कुडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना नोव्हेम्बर महिन्यात तक्रार दिली. त्यानंतरही १ महिना त्याच्या तक्रारींवर काही कारवाई न झाल्याने कुडे यांची दखल प्रसार माध्यमांनी घेतल्यावर सावकाराचा जाच व किडनी रॅकेट उघडकीस आले.

चंद्रपूर पोलिसांच्या SIT ने तपासचक्रे फिरवीत या प्रकरणातील रामकृष्ण सुंचू व हिमांशू भारद्वाज यांना अटक केली, हिमांशू व रामकृष्ण यांनी किडनी विक्री रॅकेट मध्ये सहभागी होण्यापूर्वी स्वतःची किडनी विकली व त्यानंतर एजंट म्हणून किडनी डोनर शोध सुरु केला. रोशन कुडे, रामकृष्ण सुंचू व हिमांशू भारद्वाज हे तिघेही आर्थिक अडचणीत होते. रामकृष्ण सुंचू व कुडे यांची किडनी कंबोडिया देशातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये काढण्यात आली व हिमांशू भारद्वाज ची किडनी तामिळनाडू राज्यातील त्रिची जिल्हा मधील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये काढण्यात आली होती. व हि अवैध किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया हॉस्पिटल संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी व दिल्ली मधील डॉक्टर रवींद्रपाल सिंग यांनी केली होती. सदर शस्त्रक्रिया जून २०२४ मध्ये पार पडली होती. रोशन कुडे याला हिमांशू भारद्वाज ने कंबोडिया मध्ये नेत असल्याचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला होता. Illegal Kidney Transplant

एका किडनीची किंमत ५० ते ८० लाख

पोलिसांनी दिलेल्या माहितीत एका किडनीची किंमत ५० ते ८० लाख रुपये, किडनी घेणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीनुसार, किडनी प्रत्यारोपण साठी दिल्लीमधील डॉ. रवींद्रपाल सिंग यांना १० लाख रुपये, स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांना सर्जरी व हॉस्पिटीलिटी उपलब्ध करून देण्यासाठी २० लाख व रामकृष्ण सुंचू व इतर लोकांना २० लाख रुपये व किडनी देणाऱ्या व्यक्तीस फक्त ५ ते ८ लाख रुपये मिळत होते.

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तामिळनाडू राज्यात डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी याना ताब्यात घेण्यासाठी गेले आहे मात्र अद्यापही ते पोलिसांच्या हाती लागले नाही, दिल्ली मधील डॉ रवींद्रपाल सिंग ला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यांना ट्रान्झिट रिमांड मिळावी यासाठी दिल्ली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ जानेवारी ला चंद्रपुरात हजर राहण्याचे आदेश डॉ. सिंग याना दिले आहे. ते सध्या जामिनावर आहे. रोशन कुडे यांच्या तक्रारीनंतर किडनी रॅकेट मध्ये कंबोडिया देशाचे कनेक्शन उघडकीस झाले होते, पुन्हा तपासचक्रे फिरवली असता सदर रॅकेट मध्ये भारतातील नामांकित हॉस्पिटल व बरेच डॉक्टर्स आणि एजण्ट्स यामध्ये सहभागी असल्याची माहिती उघड झाली. देशांतर्गत १० ते १५ जणांचे किडनी प्रत्यारोपण झाले असावे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर अवैध किडनी रॅकेट चा तपास अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात गठीत झालेल्या SIT अंतर्गत सुरु आहे.

Leave a Comment

+