Chandrapur Fake Death Certificate : चंद्रपूर १६ डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील पाडोली ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका जिवंत व्यक्तीला चक्क 'मृत' घोषित करून त्याचे मृत्यू प्रमाणपत्र जारी केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या संपूर्ण प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा केवळ हलगर्जीपणा नसून एक गंभीर गुन्हेगारी कृत्य असल्याची टीका NSUI आणि INTUC ने केली आहे. (चंद्रपुरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची पार्सल द्वारे डिलिव्हरी, पोलिसांची कारवाई)
या घटनेमुळे संबंधित व्यक्तीच्या कायदेशीर आणि नागरिक अधिकारांचे मोठे उल्लंघन झाले आहे, तसेच शासकीय दस्तऐवजांच्या विश्वासार्हतेलाही धक्का बसला आहे. या गंभीर प्रकारात जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी, ग्रामसेवक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची गंभीर निष्काळजीपणा किंवा संभाव्य संगनमत असण्याची भीती व्यक्त होत आहे. जोपर्यंत दोषी अधिकारी पदावर आहेत, तोपर्यंत निष्पक्ष तपास प्रभावित होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, NSUI चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष शफक इसाक शेख यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी (BDO), चंद्रपूर यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाची प्रत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनाही देण्यात आली आहे.
यावेळी INTUC चे जिल्हाध्यक्ष प्रवीण लांडगे व हिमांशू आवले हे विशेषत्वाने उपस्थित होते. सर्वानी एकमताने दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. Chandrapur Fake Death Certificate
NSUI चंद्रपूरने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, या अत्यंत गंभीर प्रकरणात त्वरित, निष्पक्ष आणि कठोर कारवाई न झाल्यास, संघटना आंदोलनात्मक पवित्रा घेण्यास बांधील असेल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.
Leave a Comment