Jatpura Gate Chandrapur : चंद्रपूर १ जानेवारी २०२६ - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कांग्रेस व भाजप पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते तिकीट वाटपाच्या गोंधळावरून चांगलेच संतप्त झाले आहे, दोन्ही पक्षांनी उपऱ्यांना संधी दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते कमालीचे संतापले आहे. (भाजपच्या उमेदवारांची अदलाबदली, अध्यक्षांची हकालपट्टी)
चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट मध्ये तीच परिस्थिती आहे, कांग्रेस पक्षाने दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांना जटपुरा प्रभागातून उमेदवारी दिल्याने कांग्रेसचे परंपरागत मतदारांत नाराजी पसरली आहे. प्रभागातील स्थानिक नगरसेवक आपल्या समस्या सोडवू शकतो, निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारून कांग्रेसने काय साध्य केलं असा प्रश्न यावेळी नागरिक व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहे.
वर्ष २०१७ मध्ये झालेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत जटपुरा प्रभाग क्रमांक ७ मधून सायराबानो काजी यांनी २ हजारपेक्षा जास्त मते घेतली होती, त्यांना यंदा तिकीट नाकारण्यात आले, त्यांनी पक्षाच्या तिकीटाची वाट न बघता अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे कांग्रेसपुढे बंडखोरांचे आव्हान निर्माण झाले आहे.
भाजपात अंतर्गत कलह सुरु आहे, अद्यापही अधिकृत उमेदवार कोण यावरून चांगलाच गोंधळ उडाला आहे, भाजपची अधिकृत यादी महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनी आपले उमेदवार त्यामध्ये समाविष्ट करीत निष्ठावंतांना डावलले असा आरोप झाल्यावर पक्षाने तडकाफडकी कासनगोट्टूवार यांची पदावरून हकालपट्टी केली. Jatpura Gate Chandrapur
प्रथमच चंद्रपुरात भाजपात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने जे उमेदवार निवडणुकीत उभे आहे त्यांचं भवितव्य काय? अशी चर्चा भाजपच्या गोटातून सुरु झाली आहे. भाजप व कांग्रेसच्या गोंधळापासून अत्यंत दूर असलेले शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार. सध्या पूर्ण ताकदीनिशी प्रचारात नियोजनबद्धता वापरत असून यंदा विजय आपलाच हि मनात भावना ठेवत प्रत्येक मतदारांच्या घरी भेट देत आहे. विशेष बाब म्हणजे प्रथमच शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी प्रभागातील चार बाजूच्या उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरविल्याने स्थानिक मतदार अत्यन्त खुश झाले आहे.
भाजप व कांग्रेस पक्ष निवडणुकीत गोंधळात असल्याने जटपुरा प्रभागातील मतदार यंदा शिवसेना ठाकरे पक्षाला जनमत देणार अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
Leave a Comment