Pratibha Dhanorkars public service example । खऱ्या लोकसेवेचा अर्थ काय असतो?, असा असतो लोकप्रतिनिधी!

January 17, 2026 by Prakash Hande

Pratibha Dhanorkars public service example

Pratibha Dhanorkars public service example : चंद्रपूर : बल्लारपूर रोडवरील एका अपघातग्रस्त पीयूष उमेश पेंदोर यांना, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विशेष प्रयत्नातून एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून तात्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, खासदाराने केली मदत

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना पीयूष उमेश पेंदोर यांच्या अपघाताची माहिती मिळताच, त्यांनी जराही वेळ न घालवता प्रशासनाशी संपर्क साधला. पीयूष यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या या संवेदनशील आणि वेगवान कार्यवाहीमुळे एकात्मिक आदिवासी विकास विभागाने तातडीने दखल घेत पीयूष यांना ही मदत मंजूर केली. member of parliament helping accident victims

त्या मदतीने आधार

या मदतीमुळे पीयूष आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. उपचारासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची सोय झाल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नेहमीच सामान्य नागरिक आणि गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=uIaw5z1a8zvm4iIL

याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, "आपल्या लोकसभा क्षेत्रातील कोणताही नागरिक अडचणीत असेल तर त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने या युवकाला वेळेत मदत मिळाली याचा मला खूप आनंद आहे. भविष्यातही नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन."

Leave a Comment

+