Road Accident at Marriage Party : गोंडपिपरी - लेकीच्या विवाहानंतर जावयाच्या घरी स्वागत समारंभासाठी निघालेल्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी मार्गावर झाला. यामध्ये नववधूच्या आईचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. २८) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. Road accident after marriage
सुधीर मुनगंटीवार यांनी सोडविला पाण्याचा प्रश्न
तारसा खुर्द येथील स्नेहा चांदेकर यांचा विवाह रविवारी (दि. २७) गोंडपिपरी येथील कन्यका सभागृहात फुलोरा हेटी येथील महेंद्र रामटेके यांच्यासोबत पार पडला होता. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी रामटेके कुटुंबीयांनी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभासाठी चांदेकर कुटुंब व वऱ्हाडी मंडळी स्कॉर्पिओ (MH 34 CD 4014) वाहनाने निघाले होते. Animal herd on road accident
दरम्यान, विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी मार्गावर अचानक जनावरांचा कळप समोर आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील स्कॉर्पिओने तीन वेळा पलटी घेत शेतात उलटले.
या भीषण अपघातात छाया दिलीप चांदेकर (वय ५०, रा. तारसा खुर्द) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मंदा मोरेश्वर उरकुडे, चेतना सुरेश कुकुडकर, कर्णिका दिनेश धांडे, अश्विनी धांडे, संगीता प्रकाश खोब्रागडे, प्रतिमा वाल्मीक भारशंकर आणि मोहन तुमडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेनंतर गोंडपिपरी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. छाया चांदेकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी वैनगंगा नदीघाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
छाया चांदेकर यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेली ही दुर्दैवी घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Comment