peacock poaching in chandrapur : चंद्रपूर - जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यातील वन्यजीव आता शहराकडे येऊ लागल्याने त्यांच्यावर आता शिकाऱ्यांच्या नजरा लागून आहे, मागील वर्षी देशातील सर्वात मोठो टोळी बहेलिया चे सदस्य राजुरा तालुक्यात आढळून आले, वनविभागाने शिकाऱ्याना अटक केली मात्र वनविभागाच्या नजरा चुकवून त्यांनी वाघांची शिकार मात्र केली. आता शहराच्या कडेला लागून असलेल्या माना टेकडी परिसरात राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार केल्या जात असलेली धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. illegal hunting of national bird
माना टेकडी हा वन सदृश्य परिसर असल्याने या निसर्गरम्य भागात सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी असंख्य नागरिक येतात. नागरिकांनी याठिकाणी अनेकदा विविध वन्यप्राणी बघितले आहे, विशेषकरून या भागात मोरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. याचाच फायदा शिकारी घेत आहे. सदर बाब जागरूक नागरिक माना निसर्ग भ्रमंती मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अनुप चिवंडे यांनी उघडकी आणली असून झरपट व इरई नदीच्या पात्राजवळ शिकाऱ्यानी तब्बल १ किलोमीटर पर्यंत जाळं लावलं होत. ते संपूर्ण जाळ चिवंडे यांनी सहकाऱ्यांसोबत मिळून बाहेर काढले.
याबाबत चिवंडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार व मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना निवेदन दिले होते मात्र त्या निवेदनाची दखल कुणी घेतली नाही. काही दिवसांपूर्वी चिवंडे यांनी मोराची शिकार करण्याच्या तयारीत असलेल्या काही इसमांना हटकले मात्र ते इसम चिवंडे यांच्या अंगावर धावून आले होते.
१९ जुलै रोजी चिवंडे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरायला गेले असता त्यांना नदीजवळील पात्रात मोरांना पकडण्याकरिता जाळं लावल्याचे दिसले त्यांनी तात्काळ सदर जाळ बाहेर काढले याबाबत वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी संपर्क केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. peacock hunting cases
माना टेकडीच्या या परिसरात झाडे-झुडपे असल्याने वन्यप्राणी या भागात येतात, मोर, अस्वल या प्राण्यांचा याठिकाणी वावर असतो मात्र काही दिवसांपासून वन्यप्राणी दिसेनासे झाल्याने चिवंडे यांनी याबाबत माहिती काढणे सुरु केले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मोरांच्या शिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी पोलीस व वनविभागाला पुन्हा निवेदन देणार असल्याची माहिती चिवंडे यांनी दिली.
Leave a Comment