Burglary accused arrested in Chandrapur : चंद्रपूर - ११ जुलै रोजी देवाला येथील ४० वर्षीय कल्पना वामन उपरे ह्या कॅटरिंग च्या कामावर गेली होती, घरी कुणी नसल्याचे बघून अज्ञात इसमाने उपरे यांच्या घरी प्रवेश करीत आलमारीतील सोन्याचे दागिने चोरून नेले. उपरे घरी आल्यावर त्यांना घरातील घराचे लॉक व सामान अस्तव्यस्त दिसून आल्याने घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी १२ जुलै रोजी पडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघता स्थानिकी गुन्हे शाखेच्या पथकाने तपासातील सूत्रे हाती घेत आरोपीचा शोध सुरू केला, तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करीत स्थानिक गुन्हे शाखेने देवाला येथील २५ वर्षीय क्रिष्णा रामप्रसाद ठाकरे याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपीकडून ३७ ग्राम सोन्याचे दागिने किंमत ३ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार व हिरालाल गुप्ता यांनी केली.
Leave a Comment