father killed by son over land dispute । ⚖️ वडिलोपार्जित शेतजमीन बनली मृत्यूचे कारण; पित्यावर धारदार हल्ला!

January 17, 2026 by Prakash Hande

father killed by son over land dispute

father killed by son over land dispute : चंद्रपूर - एखादा गुन्हा घडण्यासाठी कारण हे एकमात्र निमित्त असतं, चंद्रपुरात शेत जमिनीवरून मुलाने वडिलांचा धारदार शस्त्राने वार करीत खून केल्याची घटना २३ जून रोजी चंद्रपूर शहरातील बिनबा वार्ड मध्ये घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला अटक केली आहे.

बिनबा वॉर्डातील ६२ वर्षीय ताराचंद उर्फ दारासिंह बाबूसिंग बैस यांची वरोरा येथील मोवाडा येथे वडिलोपार्जित शेत जमीन होती, सदर जमिनीवरून बैस यांच्या घरात भांडण होत होते. मात्र या जमिनीचा वाद ताराचंद बैस यांच्या जीवावर बेतला, २३ जून ला रात्री ११ वाजता तारासिंग यांचा मुलगा ३० वर्षीय मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद उर्फ दारासिंग बैस याने त्या शेत जमिनीवरून घरी वाद घातला. Chandrapur land dispute crime report

त्या रस्त्यासाठी आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन

दारूच्या नशेत वार

मुन्ना हा दारूच्या नशेत होता, वाद वाढत गेला, वडील शेत जमीन आपल्याला देणार नाही असे समजल्यावर मुन्ना ला राग अनावर झाला, रंगाच्या भरात त्याने घरातील अवजड धारदार शस्त्र घेत वडील तारासिंग यांच्या तोंडावर, डोक्यावर व शरीरातील इतर भागावर वार करीत त्यांना जीवानिशी ठार केले. चंद्रपूर शहर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत आरोपी मुन्ना ला अटक केली.

https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=ixm--OZf_GLc-Tzf

आरोपी मुन्ना बैस वर पोलिसांनी कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. सदरची यशस्वी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे व पोलीस कर्मचारी करीत आहे.

Leave a Comment

+