voting trends today : चंद्रपूर १४ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तत्पूर्वी अनेक उमेदवारांनी शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन व थेट नागरिकांची संवाद साधत प्रचार आटोपता घेतला. यंदा जटपुरा प्रभाग क्रमांक ७ मधून सर्वसाधारण महिला गटातून शिवसेना उबाठा पक्षाकडून उभ्या असलेल्या मनस्वी संदीप गिर्हे मुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. (सुभाष कासनगोट्टूवार आक्रमक, मानहानीचा दावा दाखल करणार)
वर्ष २०१७ मध्ये जटपुरा प्रभागातून मनस्वी गिर्हे यांनी निवडणूक लढवली त्यावेळी अवघ्या २७२ मतांनी त्यांचा पराभव झाला होता, पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत काम सुरु ठेवले. पराभव झाला तरी न खचता त्यांनी स्वतःला समाजसेवेत झोकून दिले. सर्वसाधारण महिला गटात त्यांची थेट लढत भाजप महिला आघाडी अध्यक्ष माजी नगरसेवक छबू वैरागडे यांच्याशी आहे.
यंदा जटपुरा प्रभागातील शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार सामान्य नागरिकांच्या ओळखीचे असून यामध्ये जलनगर, जटपुरा व पंचशील चौकातील उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवार निवडताना चांगला निर्णय शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला असून याचा लाभ पक्षाला मिळेल अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. voting trends today
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उबाठा शिवसेना चे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली, या रॅली मुळे प्रभागातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे वातावरणचं टाईट झाले अशी परिस्थिती निर्माण झाली. विशेष बाब म्हणजे भाजप, कांग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अनेक मोठे नेते मैदानात उतरले मात्र शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी एकट्याने प्रचाराचा किल्ला सांभाळत विरोधकांना अक्षरशः हादरवून सोडले आहे.
प्रचाराचे नियोजन, उमेदवार यांच्या प्रयत्नामुळे आज शिवसेना थेट लढतीमध्ये समोर आली आहे, १५ जानेवारी ला होणाऱ्या मतदान व १६ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणी मध्ये जटपुरा प्रभागातील निकाल हा आश्चर्यचकित करणारा असेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
Leave a Comment